Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू झ्र् काळे
लातूर, १६ जून/वार्ताहर

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग १ जानेवारी २००६ पासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने १२ जानेवारी २००९ ला शासन निर्णय काढला

 

आहे, असे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.
केंद्राच्या सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याकरिता सेवानिवृत्त सचिव पी. एम. ए. हकीम यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समितीची स्थापना करण्याचा निर्णय २७ फेब्रुवारी २००९ ला घेतला आहे. त्यानुसार इतर शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर शासकीय शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००६ पासून सुधारित वेतन लागू करावे, असे महाराष्ट्र नागरी सेवा नियम अन्वये अनुसूचित केले होते.
अनुदानित अशासकीय शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करण्याबाबत, तसेच हकीम समितीने ज्या त्रुटी ठेवल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार विक्रम काळे यांनी फेब्रुवारीत बैठक घेतली होती. त्यांचाही अनेक वेळा सातत्याने पाठपुरावा केला.
सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चिती करण्यासाठी आदेश निर्गमित झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत देणे बंधनकारक राहणार आहे. यासाठी वेतननिश्चिती करण्यासाठी जिल्हास्तरीय कॅम्प आयोजित करून वेतननिश्चिती करण्याचे आदेशात नमूदही केले आहे. या विशेष प्रयत्नासाठी प्रश्न. श्याम आगळे, तानाजी पाटील, प्रश्न. मजहसदीन, प्रश्नचार्य रमेश दापके, रामदास पवार आदींनी अभिनंदन केले आहे.