Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सजग महिला संघर्ष समितीचा उद्या मोर्चा
औरंगाबाद, १६ जून /प्रतिनिधी

मानसी देशपांडे हत्या प्रकरणाचा निषेध नोंदविण्याबरोबरच आरोपींना २४ तासांच्या आत अटक करण्यात यावी या मागणीसाठी सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी (१८ जून) पोलीस

 

आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील विविध महिला संघटना, मंडळे, संस्था, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रतिनिधींची एक बैठक स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सभागृहात झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी महिलांची एक मध्यवर्ती समिती व विभागवार उपसमित्या निर्माण करण्याचे या वेळी ठरविण्यात आले. सकाळी ११ वाजता पैठणगेट येथून निघणाऱ्या या मोर्चामध्ये शहरातील सर्व महिला संघटना आणि मंडळे, जागरूक नागरिक, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे. या हत्येचा निषेध करण्याबरोबरच आपल्या सुरक्षिततेचा संकल्प करण्याची गरज असल्याचे प्रश्न. मंगला खिवंसरा, प्रश्नचार्या डॉ. मनोरमा शर्मा, डॉ. आशा साकोळकर, प्रश्न. अनुया दळवी, सुजाता कांगो, पद्मा तापडिया, डॉ. चारुलता रोजेकर, चंद्रभागा दाणे, तारा लड्डा, सुरेय्या बेगम, अ‍ॅड्. आशा रसाळ, रेखा जैस्वाल, मेजर अनुराधा कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सीबीआय चौकशी करा
या घटनेची सीबीआय या केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या खूनप्रकरणाचे गूढ उकलण्यास पोलिसांना अपयश आले आहे. आपले मूळ काम सोडून पोलीस भलत्याच कामात व्यस्त राहत असल्यामुळे सामान्यांचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे.