Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बीकॉमच्या परीक्षेत पोदार महाविद्यालयाचे वर्चस्व
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी

 

मुंबई विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिल २००९ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष वाणिज्य (टी.वाय.बी.कॉम.) अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला असून पहिले तिन्ही क्रमांक माटुंगा येथील पोदार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत. पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्येही पोदारच्याच सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सिद्धार्थ सुनील पारेख (९०.४३), दुहिता भालचंद्र श्रीखंडे (९०.२९)आणि विधी धीरज विकम (८९.५७) हे तिघेजण अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. ‘महाराष्ट्र विद्यापीठ कायद्या’नुसार ४० दिवसांच्या आतमध्ये निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. परंतु, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने हा निकाल तब्बल ६५ दिवसांनंतर जाहीर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. याबाबतची बातमी ‘लोकसत्ता’ने गेल्या आठवडय़ात सर्वप्रथम प्रसिद्ध केली होती. परीक्षेचा निकाल ५८.२६ टक्के एवढा लागला आहे. परीक्षेचा निकाल www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच २६५२६१६७, २६५२६२८२, २६५२६८६६, २६५२६२८७ या दूरध्वनी क्रमांकांवरही निकाल उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात १७ जूनपासून निकालपुस्तिका पाहण्यासाठी उपलब्ध होतील. तर २० जूनपर्यंत गुणपत्रिका व प्रमाणपत्र मिळेल. पुनर्मूल्यांकनासाठी तसेच फोटोकॉपीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात अर्ज सादर करावेत, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विलास शिंदे यांनी पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पहिल्या दहा यशस्वी विद्यार्थ्यांची नावे (काही क्रमांक विभागून मिळाले आहेत) - १. सिद्धार्थ पारेख (९०.४३), पोदार; २. दुहिता श्रीखंडे (९०.२९), पोदार; ३. विधी धिरज विकम (८९.५७), पोदार; ४. क्रिसेल वाझ (८९.४३), सेंट अ‍ॅडय़्रूज महाविद्यालय; ५. प्रेरणा केजरीवाल (८९.२९), एच. आर. महाविद्यालय; ६. मनाली पारेख (८९), पोदार; विकी वाकेर (८९), वर्तक महाविद्यालय; ७. दक्षिता शाह (८८.७१), एच.आर. महाविद्यालय; इशा जोगळेकर (८८.७१), मुलुंड कॉलेज; ८. मौसोकी शाह (८८.५७), आदित्य सुरेश खेतान (८८.५७), एन. एम. कॉलेज; हितांशु शाह (८८.५७), पोदार; मनोज छेजारा (८८.५७) आर.के.टी महाविद्यालय; ९. शितल जैन (८८.२९), के.सी. महाविद्यालय; १०. रंजिता प्रकाशमल जैन (८८.१४), एच.आर. महाविद्यालय; पुजा बाबूल सुत्रधार (८८.१४), मिठीबाई; पुजा नितीन बोतद्रा (८८.१४), पोदार; चांदनी परमजीतकौर (८८.१४), साधूबेला महाविद्यालय; दर्शन भारत राऊत (८८.१४), वर्तक महाविद्यालय. ल्ल