Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

प्रादेशिक

मध्य रेल्वेची नवी ओळख : १०० टक्के वक्तशीर!
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी
मेन, हार्बर व ठाणे-वाशी असे तीन उपनगरी कॉरिडॉर, ३१५ किमी लांबीचे रेल्वेमार्ग, ७६ स्थानके, लोकलच्या १४१० फेऱ्या, बाहेरगावी ये-जा करणाऱ्या सुमारे १६० मेल-एक्स्प्रेस व माल गाडय़ांची वाहतूक, तब्बल ३५ लाख दैनंदिन प्रवासी..असे जगातील सर्वात गजबजलेले उपनगरी रेल्वेचे जाळे असलेल्या मध्य रेल्वेसाठी सोमवारचा दिवस अत्यंत खास ठरला. सदैव बेभरवशाची सेवा म्हणून संभावना केल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेने त्या दिवशी १०० टक्के वक्तशीरपणाचे लक्ष्य गाठून सर्वाना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

‘बीओटी’ योजनांचे भवितव्य अधांतरी!
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने बीओटी तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या कामांत जनतेची मोठी फसवणूक होत असल्याचा ठपका लोकलेखा समितीने ठेवल्यानंतर बीओटी तत्वावर दिल्या गेलेल्या योजनांचे भवितव्य काय, असा प्रश्न उभा राहिला आहे. वांद्रे येथील सरकारी वसाहतीच्या पुनर्विकासासाठी बीओटी पद्धतच अवलंबण्यात येणार असून तेथील स्थानिकांच्या गृहनिर्माण संस्थेने त्याविरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

तुकोबांच्या अभंगावरून महात्माजींना स्फूरली तीन माकडांची गोष्ट!
शेखर जोशी
मुंबई, १६ जून

महात्मा गांधी यांच्या तीन माकडांची गोष्ट सर्वाना माहिती आहे. या तीन माकडांपैकी एकाने आपल्या कानावर, एकाने डोळ्यांवर तर एकाने तोंडावर हात ठेवलेला आहे. वाईट ऐकू नका, पाहू नका आणि बोलू नका, असा संदेश ती आपल्याला देत असतात. महात्मा गांधी यांच्या तीन माकडांच्या या गोष्टीचे मूळ कदाचित संत तुकाराम यांच्या एका अभंगात दडलेले असावे, असे अभ्यासकांना वाटते.

लातूरच्या बहिणींची कुंटणखान्यातून सुटका
ठाणे, १६ जून /प्रतिनिधी
नोकरीचे आमिष दाखवून राज्यातील विविध भागातील मुलींना आणून ठाण्याच्या कुंटणखान्यात विकणाऱ्या टोळीचा फसवणूक झालेल्या बहिणींनी पर्दाफाश केला आहे. ठाण्यातून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या प्रमुख आरोपीला अटक झाली असून महिला दलालासह तिघांचा पोलीस शोध घेत आहे.

निंबाळकर यांची हत्या राजकीय हेतूनेच-सीबीआय
अण्णा हजारे यांच्या हत्येच्या सुपारीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्याचे संकेत
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते आणि खासदार पद्मसिंह पाटील यांनी काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट राजकीय हेतू आणि आर्थिक घोटाळे उघडकीस येण्याच्या भीतीतून रचल्याचे चौकशीतून निष्पन्न झाल्याचा खुलासा ‘केंद्रीय अन्वेषण विभागा’चे (सीबीआय) अतिरिक्त महासंचालक बलविंदर सिंग यांनी आज केला.

हजारो प्रवाशांचे जीव वाचविणाऱ्या उद्घोषकाचे न्यायालयाकडून कौतुक
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी

मुंबईवरील हल्ल्याच्या दिवशी सीएसटी स्थानकात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल मृत्यूचे तांडव घालत असतानाच प्रसंगावधान दाखवून हजारो प्रवाशांना स्थानकातून पळून जाणाची घोषणा करणाऱ्या सीएसटी येथील उद्घोषक विष्णू झेंडे यांनी खरोखर खूप कौतुकास्पद कामगिरी केल्याचे उद्गार विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी काढले.

मुंबई विद्यापीठातील नियमबाह्य़ अधिव्याख्यात्याची नियुक्ती रद्द
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी

परराज्यातील मागासवर्गीयांना महाराष्ट्रातील शासकीय सेवेमध्ये जातीच्या प्रमाणपत्राआधारे कोणताही लाभ मिळत नाही. याबाबत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने २४ ऑगस्ट १९९५ रोजी शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. परंतु, या जीआरला केराची टोपली दाखवित आसाममधील मौसमी गलवणकर नावाच्या महिलेला अधिव्याखाता पदावर नेमण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या अंगलट आला आहे.

तीन वर्षांत पोलिसांना सरावाकरिता गोळ्याच नाहीत!
मुंबई, १६ जून/प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असलेल्या हसन गफूर यांच्यावर राम प्रधान समितीने त्यांचे नेतृत्व कुचकामी ठरल्याचा ठपका ठेवला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या शस्त्रास्त्र खरेदी संदर्भात २००० साली तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी काढलेल्या आदेशामुळे पोलीस हल्ल्याच्या वेळी शस्त्रसज्ज नसल्याचा अभिप्रायही समितीने दिला आहे. गेल्या तीन वर्षांत पोलीस दलाला सरावासाठी गोळ्यांचा पुरवठाही झालेला नसल्याची धक्कादायक बाब या अहवालात उघड करण्यात आली आहे.

विधिमंडळात गदारोळ; रावते, अरविंद सावंत, विनोद तावडे निलंबित
मुंबई, १६ जून/प्रतिनिधी

राम प्रधान समितीचा अहवाल आश्वासन दिल्यानुसार आज सरकारने सदनासमोर न ठेवल्याने विरोधी सदस्यांनी विधान परिषदेत तुफान गोंधळ घातला. सभापतींच्या समोरील कागदपत्रे भिरकावणे, त्यांच्या आसनाशेजारी जाऊन घोषणा देणे, हावभाव करणे आदी गोष्टींमुळे अखेर शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते, अरविंद सावंत यांचे सदस्यत्व त्यांची मुदत संपेपर्यंत तर भाजपचे विनोद तावडे यांचे सदस्यत्व तीन वर्षांपर्यंत निलंबित करण्यात आले.

नियंत्रण कक्षातून आयुक्तांनाच दिली गेली खोटी माहिती!
* करकरेंच्या संदेशाकडे दुर्लक्ष
* दाते यांनी दोन अतिरेक्यांबाबत दिलेली माहितीही लपविली!

मुंबई, १६ जून / प्रतिनिधी

२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या दिवशी नियंत्रण कक्षाचा कार्यभार सांभाळणाऱ्या पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांनी दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तांनाच खोटी का माहिती दिली तसेच दिवंगत सहआयुक्त हेमंत करकरे यांच्या संदेशाकडे दुर्लक्ष का केले तसेच त्यावेळी जखमी झालेल्या अतिरिक्त आयुक्त सदानंद दाते यांनी अतिरेक्यांच्या ठावठिकाण्याबाबत दिलेली माहिती का लपविली याची विशेष पथकामार्फत चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा शिवसेनेचे आमदार गजानन किर्तीकर यांनी कपात सूचनेद्वारे मांडला आहे.

निंबाळकर यांची हत्या राजकीय हेतूनेच-सीबीआय
अण्णा हजारे यांच्या हत्येच्या सुपारीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्याचे संकेत
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते आणि खासदार पद्मसिंह पाटील यांनी काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट राजकीय हेतू आणि आर्थिक घोटाळे उघडकीस येण्याच्या भीतीतून रचल्याचे चौकशीतून निष्पन्न झाल्याचा खुलासा ‘केंद्रीय अन्वेषण विभागा’चे (सीबीआय) अतिरिक्त महासंचालक बलविंदर सिंग यांनी आज केला.

‘बेस्ट’च्या वीज दरवाढीला बेस्ट समिती सदस्यांचा विरोध
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी
‘बेस्ट’च्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला वीज नियामक आयोगाने मंजूरी दिली असली तरी बेस्ट समितीच्या सदस्यांनी मात्र या दरवाढीचा तीव्र विरोध केला आहे. या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूरी दिली जाणार नाही, असे या सदस्यांनी स्पष्ट केले. बेस्ट समितीवर सध्या सेना-भाजपचे वर्चस्व आहे. समितीचे अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिलीप पटेल यांच्याकडे आहे. त्यांच्यासह इतर सदस्यांनी ही दरवाढ मागे घेण्याची मागणी आज केली. शिवसेनेचे सुनील प्रभू, भाजपचे गटनेते आशिष शेलार, काँग्रेसचे रवी राजा यांनी दरवाढ जास्त असल्याचे सांगितले. रिलायन्सच्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा या सदस्यांनी दिला आहे.

वीज दरवाढीच्या फेरविचाराची मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी
मुंबई, १६ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने रिलायन्स कंपनीला मंजूर केलेली दरवाढ ही सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडणारी आहे, असे मुंबई ग्राहक पंचायत या संस्थेतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. पंचायतीतर्फे अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी म्हटले आहे की, दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकावर नियामक आयोगाने ४५ ते ६१ टक्के वीज दरवाढ लादली आहे. दरमहा १०० युनिट वीज वापरणाऱ्यांना २०२ रुपये बिल भरावे लागत होते, दरवाढीनंतर हेच बिल ३२६ रुपये एवढे असणार आहे. १५० युनिटसाठी ग्राहकांना ४०३ रुपयांऐवजी ६२४ रुपये बिल भरावे लागणार आहे. इतकी भयानक दरवाढ समर्थनीय नसून वीज नियामक आयोगाने याबाबत फेरविचार करण्याची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आली आहे.