Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

कारवाईच्या कचाटय़ात बेशिस्त रिक्षाचालक
प्रतिनिधी / नाशिक

पोलीस आयुक्तांवरील बदलीची टांगती तलवार दूर झाल्यामुळे उत्साहित झालेल्या पोलीस यंत्रणेने नियमांचे उल्लंघन करून शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटील बनविण्यास कारणीभूत ठरलेल्या बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात मंगळवारपासून कठोर मोहीम हाती घेतली आहे. बेशिस्तीचे प्रदर्शन करीत प्रवाशांना सौजन्यपूर्ण सेवा देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या शेकडो रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

लोकज्योती मंचतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा
प्रतिनिधी / नाशिक

प्रत्येक वर्षी आपला वर्धापनदिन वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी साजरा करणाऱ्या येथील साप्ताहिक लोकज्योती व लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे वर्धापन दिनानिमित्त गुरूवारी महाकवी कालिदास कलामंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मिश्रांचे आसन बळकट होताच
अनेक गुंडांचा शहरातून काढता पाय
प्रतिनिधी / नाशिक
आपापल्या राजकीय ‘गॉडफादर’च्या वरदहस्तामुळे चौकाचौकात तरुणांचे जथ्थे जमवून झुंडशाहीच्या बळावर सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या गुंडांचे धाबे विष्णुदेव मिश्रा हे पोलीस आयुक्तपदी कायम राहिल्याने चांगलेच दणाणले असून ‘रेकॉर्ड’वर असलेले अर्धेअधिक गुंड शहरातून परागंदा झाले आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे या पदावरून सरकारने मिश्रांना तडकाफडकी उचलले होते, पण जनतेच्या रेटय़ामुळे अखेर ते या पदावर कायम राहिल्याचे पाहून अनेक समाजकंटकांनी विशेषत: विविध राजकीय पक्षांचे टिळे लावून फिरणाऱ्या त्यांच्या म्होरक्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसते.

प्रतिनिधी / नाशिक
शहरवासियांच्या अभूतपूर्व आंदोलनामुळे पोलीस आयुक्तांची बदली स्थगित करण्याचा निर्णय अखेर राज्य शासनाला घ्यावा लागला असला तरी आता पोलीस आयुक्त म्हणून काम करताना विष्णुदेव मिश्रा यांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. अर्थात, ही बाब खुद्द मिश्रा यांनाही मान्य असली तरी त्यांना समर्थन देण्यासाठी जे-जे नाशिककर हिरीरिने रस्त्यावर उतरले त्यांच्याही पोलीस आयुक्तांकडून काही अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. या अपेक्षा त्यांच्याच शब्दात मांडणारे सदर..

पाण्याचे खासगीकरण आणि संभाव्य धोके
पाणी वापराच्या संदर्भात अलीकडे काही धोरणात्मक बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातून पाण्याच्या खासगीकरणाची चर्चाही वेग घेत आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या निवेदनातील ठळक मुद्दे..

नाशिक विभागीय लोकराज्य प्रेरणा युवा मंचचे उद्घाटन
नाशिक / प्रतिनिधी
महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी वर्षांचे औचित्य साधून तरुणांना स्पर्धा परीक्षा व करीअर संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय लोकराज्य प्रेरणा युवा मंचची संकल्पना राज्यभर अंमलात आणत आहे. या अंतर्गत लोकराज्य प्रेरणा युवा मंचची सुरूवात राज्यात सर्वात प्रथम नाशिक येथून करण्यात आली. नाशिक विभागीय लोकराज्य प्रेरणा युवा मंचचे उद्घाटन महाकवी कालिदास कलामंदीर येथे अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या ‘स्पर्धा परीक्षा आणि करीअर मार्गदर्शन’ या कार्यक्रमात करण्यात आले.

‘नवोदित महाराष्ट्र श्री २००९’चे आयोजन
प्रतिनिधी / नाशिक

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने येत्या शुक्रवारी सायंकाळी पाचला ‘नवोदीत महाराष्ट्र श्री २००९’ या स्पर्धेचे आयोजन मुंबईनाका येथील दादासाहेब सभागृहात करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ आणि त्यावरील वजनी गटात होणार आहेत. आठही वजनी गटासाठी या स्पर्धेत अनुक्रमे पहिल्या पाच विजेत्यांना प्रत्येकी तीन हजार, दोन हजार पाचशे, दोन हजार, एक हजार पाचशे आणि एक हजार तसेच पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या शिवाय, बेस्ट पोझरला व मोस्ट इंप्रुव्ह बॉडी बिल्डरला तीन हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. अंतिम विजेत्यास ५१,००० मानाच्या किताबासह, आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खा. समीर भुजबळ, राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिककरांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.