Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

कोणताही शब्द जेव्हा लिहिला जातो, तेव्हा त्याला दीर्घायुष्य लाभत असतं. मनातून तो कागदावर उतरतो, तेव्हा त्याचा अर्थ पाझरायला लागतो. त्या अर्थातून अनेक अर्थाची शक्यता निर्माण होते. मनातलं असं कागदावर लिहिणं ही एक फार मोठी प्रक्रिया असते. आपल्या ती सहजासहजी लक्षात येत नाही, पण ती घडण्यापूर्वी आपल्या मनात खूप मोठय़ा प्रमाणावर उलथापालथ होत असते. आपण लिहितो, म्हणजे जे मेंदूच्या अवकाशात निर्माण होत असतं, ते अमूर्त असं काही शब्दांच्या अर्थाच्या चिमटीत शोधण्याचा प्रयत्न करतो. असा प्रयत्न वाचणाऱ्याला तसाच्या तसा भावेलच याची खात्री नसतानाही आपण ते करत असतो.

‘अभिव्यक्ती समर्थन नागरिक पंचनामा’ तंत्र यशस्वी
‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी म्हण ग्रामीण भागात रुढ झाली आह़े ‘आम्ही जनतेचे सेवक आहोत, त्यांच्या प्रती आमची उत्तरदायीत्वाची भावना असली पाहिजे’, ही मानसिकताच सरकारी कार्यालयांत लोप पावत असल्याने त्याचे विपरित परिणाम जनसामान्यांना वर्षांनुवर्ष भोगावे लागतात़ या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी व शासकीय कार्यालयातील कामकाज गतिमान करण्याचा एक यशस्वी प्रयत्न ‘अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटना’ या पत्रकारांच्या संघटनेने राज्यात प्रथमच यशस्वी केला आह़े

‘काय तात्यानू गावाक गेलल्यात की काय हल्ली बरेच दिसात भेट नाय तुमची?’
‘गावाक गेललय बाबा. गावाक पावस काय झकास पडतासा. यंदा तर सात जूनाक पावस हजर झालो. पेरणी केलय आणि तसोच परतान इलय.’
‘पण बाबल्या मुंबयकरांची पापा खूप झाल्यानी म्हणान यंदा अजून पावस नाय.’
‘असल्या अंधश्रद्धेवर माझो इश्वास नाय तात्यानू.’
‘अरे पडतलो कसो पावस या कांक्रीटच्या जंगलात. होती नव्हती ती सगळी झाडा तुम्ही तोडल्यानी. या पाप सगळ्यांक आता भोगूचा लागतासा.’
‘अरे मुंबयत पावस नाय म्हणतत पण एकीकडे नुसत्यो इजो कडाडतसत आणि दुसरीकडे भूकंप झाल्यानी.’
‘खयसरल्यो इजा आणि भूकंपाच्यो गजाली करतसात तात्यानू?’
‘अरे बाबा राष्ट्रवादीत इजा कडकडतसत आणि भाजपात भूकंप झालोसा..’
‘माका वाटलाच तुमी या दोन पक्षार घसरतल्यात ते. अहो आता मेलल्या वाघाक मारुन आता तुमी काय मोठो वाघ मारतासात’
‘मेलल्या वाघाचो संबंध नाय बाबा, राष्ट्रवादी पक्षाची काय उडी होती. देशाक नेतृत्त्व दिवची त्येंची भाषा होती. मराठी पंतप्रधान पयलो ते दितले होते. पण आता केंद्रात सत्ता रवलीसा कांग्रेसच्या इच्छेर. हिकडे पद्मसिहाच्या कत्वृत्वामुळे तर पक्षाचे धिंडवडे निघसतत.’ ‘तात्यांनू सोडून द्या हो, सगळ्याच पक्षाक नेहमीच सारखे दिवस नसतत. वायटय दिस येतत. सध्या तुमच्या कांग्रेसाक बरे दिस आसत. आणि तुमी भूकंपाचा काय ता सांगी होत्यात..’
‘अरे भाजपाची सत्ता येवक नाय म्हटल्यार त्या पक्षात आता भूकंपार-भूकंप जातसत. एक भूकंप केल्यानी जसवंत सिंगांनी दुसरो केल्यांनी यशवंत सिन्हांन. एकूणच काय पक्षाक वायट दिस आयले की सगळेच खावक उठतत.’
‘शेवटी काय, सगळ्या राजकारण सत्तेभोवती काय ता फिरत असता. जर कांग्रेसाक सत्ता मॅळली नसती तर त्या पक्षातय अशीच भांडणा झाली असती.’
‘असाच असता, शेवटी सत्ता महत्त्वाची. रामविलास पास्वान कोणाचीय सत्ता असती तर सरकारमध्ये दिशी. मग भाजपचा असो वा कांग्रेसचा सरकार असो. या पास्वानाची मत्रिमंडळात वर्णी लागूकच होयी. याच वेळी पास्वानाक लोकांन घरी बसवल्यानी. म्हणान तेचो चेहरो टी.व्ही.र दिसणा नाय.’
‘शेवटी कोणतोय पक्ष असानी, त्येंचा राजकारण सत्तेसाठीच चलता. लोकांच्या हिताचा त्येंका काय देणा नाय की घेणा नाय.’
‘तात्यानू अशे अगतीक जावन बोलू नकात. सगळ्याच पक्षार अशी येळ येताच. तुमच्या कांग्रेसार नाय सत्ता गेल्यार वायट दिस आयल्ले. आता सोनियाक डोक्यार घेवन नाचणारे हेच लोक सत्ता गेल्यार शिव्यो घालूक मागे पुढे रवचे नाय. असाच असता राजकारण.’
‘खसयरय गेल्यात तर हीच स्थिती असता बाबल्या. विजेत्याच्या मागे लोकांची रिघ असता. तर हरलेल्याक शिव्यो खावच्यो लागततच. जगाचो होच नियम आसा. त्याका आपल्याकडे तो अपवाद नाय.’
‘जाव दे तात्यांनू, तुमी जास्त इचार करु नकात. तुमचा यंदा कोण आसा काय एस.एस.शी.क?’
‘कित्यक?’
‘तसा नाय अकरावीच्या प्रवेशाचो सरकारी जो घोळ चलल्लोसा तो बघसतात की नाय?’
‘बघतसय बाबा, माका तर काय समाजणासाच नाय. आमच्या येळी आपली एकच एस.एस.शी.च होती. सहज चालत जावन पोरां कालेजात प्रवेश घेयत. त्यावेळी अशी गर्दी नव्हती. नाय एवढे पोरांक मार्क मॅळत.’
‘अहो तात्यानू, आता ९९ टक्क्यांचो जमानो आसा. या स्पर्धेत तुमचो निभाव लागूचो नाय.’
‘या मात खरा आसा. पुढच्या काळात शंभरात दोनशे मार्कय पोरा मिळयतीत. असा काय झाला तर आश्चर्य वाटूक नको.. आमी बुवा या बघूक नसलोव म्हणजे मिळवल्यानी.’
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com