Leading International Marathi News Daily
बुधवार, १७ जून २००९

पशुवैद्यकीय क्षेत्रातील संधी
आजवरच्या मनुष्याच्या इतिहासात आपल्याला एक गोष्ट सातत्याने आढळून येईल ती म्हणजे मनुष्य हा काळाच्या कलाने वेळोवेळी आपल्या प्रगतीचे वेगवेगळे मार्ग अवलंबत गेला आहे. आजचा कल हा आय. टी. सेक्टरचा कल आहे हे सांगण्याची काही आवश्यकता नाही. या वाढत्या क्षेत्राच्या वलयाखाली इतर क्षेत्रांची महती हरवून गेल्यासारखी आज आपल्याला जाणवते. Veterinary Science पशुवैद्यकीय शास्त्र हे असेच एक क्षेत्र आहे.
इतर क्षेत्रांच्या विपरीत (पशुवैद्यकीय शास्त्र) Veterinary Science मध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्यांना आपला अष्टपैलू सर्वागीण विकास करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतामधील पशुधनाची संख्या जगात सर्वात मोठी आहे. आजच्या काळातील पशुधन क्षेत्रातला विकास हा कित्येक वर्षाखाली सुसंगतरीत्या अमलात आणलेल्या योजनांचा परिणाम आहे. भारताच्या याच दृष्टी क्षेपाचा परिणाम म्हणून आज आपण जगात दूध उत्पादनामध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहोत. बदलत्या काळाप्रमाणे Veterinary Science या क्षेत्राने देखील आपला चेहरामोहरा बदलून एक नवे रूप आणि स्थान प्रश्नप्त केले आहे. आजच्या काळातील Veterinarian बऱ्याच क्षेत्रांमध्ये आपली
 

गुणवत्ता सिद्ध करण्याची अप्रतिम संधी उपलब्ध आहे. पशुवैद्यक म्हणजे केवळ गुरांचा डॉक्टर ही कुचकामी संकल्पना आज विलुप्त होऊन त्या जागी आजचा Veterinarian हा एक बऱ्याच क्षेत्रांमध्ये आपल्या सेवा प्रदान करणारी व्यक्ती म्हणून दिसून येतो. उदाहरण द्यायचेच झाले तर सरकारी नोकरी, सायन्टिस्ट, सुरक्षाबलामध्ये, रीसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये, वन्य जीवन संशोधन क्षेत्रामध्ये, पोल्ट्री, लेदर, फिड इत्यादी इंडस्ट्रीजमध्ये व आणखी बऱ्याच क्षेत्रांमध्ये.
खरे नाही ना वाटत! पण होय हे सर्व खरे आहे. एवढंच नाही तर आजचा Veterinarian हा बँकिंग, इन्शोरन्स व वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांमध्ये यशस्वीरीत्या काम करताना दिसतो.
भारतीय सैन्यामध्ये त्यांच्या विविध प्रकारच्या अ‍ॅनिमल स्कॉड व अ‍ॅनिमल फार्मसची काळजी घेण्याकरीता दरवर्षी मुबलक संख्येमध्ये Veterinarian ची मागणी असते. याखेरीज सरकारी क्षेत्रामध्ये केंद्र व राज्यशासनाच्या पशुसंवर्धनविषयक धोरणांच्या राबवणीकरिता Veterinarian (पशुवैद्यकीय अधिकारी)ची मागणी असते. Veterinary किंवा पशुवैद्यकीय शास्त्राचा अभ्यासक्रम हा मुळात लाईफ सायन्सेसचा एक घटक असल्यामुळे यातील ग्रॅज्युएटला रीसर्च आणि डेवलपमेंट क्षेत्रामध्ये संशोधन कार्यासाठी भरपूर मागणी असते. याखेरीज Veterinary Science ग्रॅज्युएट औषध कंपन्यांसाठी लागणाऱ्या स्टडफार्मस (घोडय़ांचा फार्म), अ‍ॅनिमल हाऊस इत्यादींमध्ये पाहिजे असतात. पोल्ट्री इंडस्ट्रीज आज देशातील गव्हर्नमेंट सेक्टरपाठोपाठ रोजगार देणारी दुसरी सगळ्यात मोठी इंडस्ट्री होऊ पाहात असताना यात लागणाऱ्या वेटरनरी सेवेचे महत्त्व आपल्या निदर्शनास हळूहळू येत आहे. निरनिराळ्या बँक आणि इतर वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था जसे इन्शोरन्स इत्यादीमध्ये देखील Agriculture field officer म्हणून बरेच Veterinarians ची गरज असते.
एवढे सगळे असताना आपण या क्षेत्राला दुर्लक्षित करणे हे आपल्या बौद्धिक क्षमतेची दिवाळखोरी ठरेल असे म्हणायला काहीच हरकत नाही.
भारतामध्ये Veterinary Science मधील स्नातकाला BVSC & AH ही पदवी प्रदान केली जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये ‘महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (Maharastra Animal & Fishries Science University) हे पशुवैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सेवारत असलेले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाअंतर्गत परळ येथे असलेले ‘मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय’ हे पशुवैद्यकीय शिक्षण क्षेत्रात १८८६ पासून सेवारत असलेले दक्षिण आशियातील सगळ्यात जुने Veterinary Science कॉलेज आहे. तसेच या कॉलेजला संलग्न असे तेवढेच जुने सर्व सोयींनी उपयुक्त प्रश्नण्यांचे हॉस्पिटल सुद्धा आहे.
BVSC & AH या अभ्यासक्रमाकरिता MS-CET ही परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यातील मिळणाऱ्या गुणांच्या आधारे अ‍ॅडमिशन मिळते. शेतजमीन असलेल्या कुटुंबातील अपत्यांना यामध्ये १२ गुण वाढीव मिळतात. या अभ्यासक्रमाची अ‍ॅडमिशन प्रक्रिया साधारणत: MS-CET परीक्षेच्या एका आठवडय़ानंतर सुरू होऊन साधारण जुलै महिन्यापर्यंत चालते. विस्तृत माहिती ‘मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय’ येथे २४१३११८०/ २४१३७०३० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून अथवा युनिवर्सिटी वेबसाईट www.mafsu.co.in वर संपर्क साधून मिळवता येईल.
डॉ. अमित अ. हाते
डॉ. ता. रा. निकम

विस्तार शिक्षण विभाग,
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, संपर्क- ९९८७७८८५४९