Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

देवळीत सत्ता स्पर्धेचा रंगतदार अध्याय
वर्धा, १६ जून / प्रतिनिधी

माजी आमदार रामदास तडस व काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांच्यातील राजकीय स्पर्धेत काँग्रेसवर बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख गफ्फोर हे देवळीचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले असतानाच जिल्ह्य़ाच्या राजकारणात राजकीय सत्ता स्पर्धेचा एक रंगतदार अध्याय रचला गेला. सुरुवातीला पळवापळवी व त्यानंतर अपहरण नाटय़ आणि आज मारहाण, मोडतोड व गदारोळात नाटय़ाचा समारोप देवळीकरांनी अनुभवला. मेघे-कांबळे युतीच्या विरोधावर मात करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार रामदास तडस यांनी एका मताच्या फ रकाने देवळी पालिकेची सत्ता परत प्रश्नप्त केली.

पर्यावरण दिन, मद्य रजनी
वनअधिकाऱ्यांच्या ‘प्रतापा’ची चौकशी करण्याची आमदार धुर्वे यांची मागणी

यवतमाळ, १६ जून / वार्ताहर

जागतिक पर्यावरण दिन साजरा करून तितक्याच उत्साहात त्याच दिवशी वनखात्याच्या विश्रामगृहात दारू आणि मटनाची पार्टी झोडणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन या प्रकरणी सरकारने चौकशी सुरू केल्याची माहिती केळापूरचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’ला दिली. आमदार डॉ. धुर्वे यांनी सांगितले की, शासकीय विश्रामगृहात मद्य प्रश्नशनास आणि मांस खाण्यास सक्त मनाई आहे. तसा शासन निर्णयसुद्धा जारी झालेला आहे.

विकास कामांचा धडाका
राजेश्वर ठाकरे

जनतेच्या प्रश्न, शासकीय योजनांची माहिती आणि काम करण्याचा धडाका यामुळे विरोधी बाकावर असूनदेखील अनेक विकास कामे करण्यात कामठीचे भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यशस्वी झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याचा अनुभव असल्याने अगदी शेवटच्या माणसापर्यंतच्या समस्या समजून घेऊन त्या मार्गी लावण्यात ते अग्रेसर असल्याचे दिसून येते. प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्याची हातोटी असल्यामुळे विरोधी पक्षाचा आमदार असल्याने काम होत नाहीत, अशी ओरड करण्याची त्यांच्यावर वेळच आलेली नाही.

बनगाव प्रश्नदेशिक पाणीपुरवठा योजनेला गती
गोंदिया, १६ जून / वार्ताहर

आमगाव तालुक्यातील बनगावसह ४८ गावांची प्रश्नदेशिक पाणीपुरवठा योजना सतत सुरू राखण्यासाठी लाभार्थी जनतेचे सक्रिय सहकार्य मिळाल्यास ही योजना यशस्वी होऊ शकते त्यात सरपंच, ग्रामसेवक, प्रश्नदेशिक पाणीपुरवठा समितीचेसुद्धा सहकार्य अपेक्षित आहे. शासन या संदर्भात मदत करायला तयार आहे, असे आश्वासन जिल्हाधिकारी अविनाश झाडे यांनी दिले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आलेल्या बनगाव प्रश्नदेशिक पाणीपुरवठा समितीचे पदाधिकारी, संबंधित ४८ गावांचे सरपंच, महाराष्ट्र जीवन प्रश्नधिकरणाचे अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद गोंदियाचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.

महिलांच्या विकासाकरिता काँग्रेस कटिबद्ध
बुलढाणा, १६ जून / प्रतिनिधी

येथील गांधीभवनात १३ जूनला बुलढाणा महिला काँग्रेसची बैठक झाली. काँग्रेसने नेहमीच महिलांना सन्मानाची वागणूक देऊन सर्वोच्च पदावर महिलांना आरूढ करून कृतीतून दाखवून दिले आहे, असे मत जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय अंभोरे यांनी व्यक्त केले. भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांनी पंचायत राज व्यवस्थेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन एक क्रांतिकारी पाऊल उचलले. त्याच मार्गाने जात युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभा अध्यक्षपदी मिराकुमार यांची निवड करून एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.

प्रश्नेग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
गोंदिया, १६ जून / वार्ताहर

येथील उमादेवी बहुउद्देशीय शिक्षणसंस्था द्वारा संचालित प्रश्नेग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाच्या पायाभूत अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच कला संचालनालयाने जाहीर केला. यात त्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी दर्शना चव्हाण विदर्भातून प्रथम क्रमांकावर राहिली. तिने प्रथम श्रेणी मिळवित ७५.३० टक्के गुण मिळविले. तसेच ती महाराष्ट्रातून तृतीय क्रमांकावर राहिली. याच महाविद्यालयाचा विद्यार्थी दीपक रामटेके ६१.४० टक्के गुण घेऊन महाविद्यालयात द्वितीय क्रमांकावर राहिला. कन्हैया आंबाडारे, रुथ बास्के, प्रिया कांबळे, देवेंद्र मसे, भारती गाढवे, जे.के. राव नायडू हे विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व गुणवत्ता प्रश्नप्त विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय आई-वडिलांना तसेच प्रश्नचार्य प्रदीप तोमर, प्रश्नध्यापक अभय गुरव यांना दिले. संस्थेचे सचिव एन.आर. कटकवार, अध्यक्ष पंकज कटकवार, ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, संध्या राव, वंदिता हेमने, तसेच समस्त प्रश्नेग्रसिव्ह कर्मचाऱ्यांनी गुणवत्ता प्रश्नप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

खामगाव तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींनी राबवला विहीर पुनर्भरण कार्यक्रम
खामगाव, १६ जून / वार्ताहर

सततच्या पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी उपविभागीय अधिकारी सोरमारे व गटविकास अधिकारी माडीवाले यांच्या प्रेरणेने खामगाव तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीनी शासकीय विहीर पुनर्भरण कार्यक्रम यशस्वीपणे राबविला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. खामगाव तालुक्यातील ९० टक्के गावांना याचा फटका बसला आहे. ही परिस्थिती पुढच्या वर्षी येऊ नये म्हणून खामगावचे उपविभागीय अधिकारी सोरमारे गटविकास अधिकारी माडीवाले यांनी पुढाकार घेऊन ग्रामसेवक व सरपंचाना विश्वासात घेतले व विहीर पुनर्भरणाचे महत्त्व पटवून दिले. विहीर पुनर्भरणामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढून ती टिकून राहते, अशा प्रकारचे प्रयोग शासकीय विहिरी व बोअरवेलबाबत उपयुक्त ठरत आहे. राहुल येथील सरपंच लक्ष्मणराव देशमुख, पिंप्री गवळी येथील सरपंच सविता गासे, जळका भडांगे येथील सरपंच गजानन वरकड, भंडारी येथील सरपंच विजयसिंह जाधव, बोरजवळा येथील सरपंच रतनसिंग तोमर, खुटपुरी येथील सरपंच कस्तुरा गवळी, कोलोरी येथील सरपंच कुसुम टिकार, जयपूर लांडे येथील सरपंच समंगा लांडे व सुटाळा येथील सरपंच गजानन वानखडे यांनी सचिवाच्या मदतीने विहीर पुनर्भरण कार्यक्रम राबविला आहे. आणखी गावात हा कार्यक्रम राबविण्याचे उद्दिष्ट आहे.

विनायक मेटेंना पदावरून हटवा -डॉ. जगन्नाथ ढोणे
अकोला, १६ जून/ प्रतिनिधी

मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करूपाहणाऱ्या विनायक मेटे यांना पदावरून काढण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जगन्नाथ ढोणे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना एका निवेदनातून केली आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची मागणी करून विनायक मेटेंनी मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप डॉ. ढोणे यांनी केला आहे. मराठय़ांचा पक्ष अशी राष्ट्रवादी काँंग्रेसची चुकीची प्रतिमा जनमानसात उभी राहिली असताना, मेटे मात्र त्यालाच खतपाणी घालत असल्याचेही डॉ. ढोणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसून त्यांना तातडीने पदावरून काढण्यात यावे, अशी मागणी डॉ. ढोणे यांनी केली आहे. मेटेंना संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. पक्षातील इतर मराठा नेत्यांच्याही मागे मराठा समाज आहे. त्यामुळे मेटे यांची निवड रद्द करण्यात यावी, असे डॉ. ढोणे यांनी म्हटले आहे.

अकोल्यात पिस्तुलांसह दोघांना अटक
अकोला, १६ जून / प्रतिनिधी

विदेशी बनावटीची दोन पिस्तुले आणि जिवंत काडतुसांसह दोघांना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी जुन्या शहरातून अटक केली. प्रेम पालकर (२२) व ईवर गोजे (२०) यांना पिस्तुलांसह अटक करण्यात आली. जुन्या शहरात प्रेम पालकर संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून पिस्तुल सापडल्यामुळे त्याची चौकशी करण्यात आली. त्याने ईश्वर गोजेकडून पिस्तुल घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने मारुती नगरातील गोजेच्या घरी छापा घातला. या छाप्यात आणखी एका पिस्तुलासह गोजेला अटक करण्यात आली. हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लेखणीबंद आंदोलनाचा पटवारी संघाचा इशारा
अकोला, १६ जून/ प्रतिनिधी

तलाठी इंगळे आणि मंडळ अधिकारी कातखेडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे अन्याय्य असून, ते मागे न घेतल्यास लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा पटवारी संघाने जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनातून दिला आहे. तलाठी आर. एच. इंगळे आणि मंडळ अधिकारी कातखेडे यांच्यावर अकोट पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे अन्यायकारक असल्याचा आरोप पटवारी संघाने केला आहे. गुन्हे दाखल करण्यापूर्वी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र ती घेण्यात आली नाही. त्यामुळे दोषी पेालीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, इंगळे आणि कातखेडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी पटवारी संघाने केली आहे. अन्यथा लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अनिल बेलाडकर, गजानन भगत, एस. आर. बुटे, शशिकांत शिंदे, व्ही. एल. पारसकर यांनी दिला आहे.

संवेदनशीलता हा होमगार्डचा स्थायीभाव असावा-खोब्रागडे
भंडारा, १६ जून/ वार्ताहर

होमगार्ड हा उत्तम कार्यकर्ता असावा आणि त्याचा प्रमुख गुण संवेदनशीलता असावा. त्यामुळे समाजाच्या दु:खाची जाणीव होऊन तो सेवेत स्वत:ला झोकून देईल, असे विचार भंडारा- गोंदिया जिल्हा होमगार्डचे जिल्हा समादेशक अ‍ॅड. धनराज खोब्रागडे यांनी व्यक्त केले. शहापूर, मारेगाव पुनर्वसन केंद्राच्या पटांगणावर आयोजित शहरी होमगार्ड उजळणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी धनराज खोब्रागडे बोलत होते. शिबिर प्रमुख पवनीचे समादेशक अधिकारी प्रश्न. ओमप्रकाश वैद्य यांनी प्रश्नस्ताविक केले. केंद्रनायक पी.आर. अलगरे व पलटन नायक मुकुंद चन्न् यांनीही मार्गदर्शन केले. आभार निदेशक सुरेश दिवटे यांनी मानले.

यवतमाळात फळविक्रेत्याचा खून
यवतमाळ, १६ जून / वार्ताहर

शहरातील ‘मंडी गँग’ म्हणून कुख्यात असलेल्या टोळक्याने आठवडी बाजारातील महंमद शफीक नावाच्या फळ विक्रेत्याची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना सोमवारी घडली. महंमद शफीक हा ‘आंबा विक्रेता’ असून आठवडी बाजारात आंबे विकताना त्याचा चुकून एकाला धक्का लागला एवढय़ा क्षुल्लक कारणावरून मंडी गँगच्या टोळक्याने महंमद शफीकचा चाकूने भोसकून खून केला. आरोपी घटना स्थळावरून लगेच फरार झाले. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी मख्खी लोंढी आणि नीलेश आत्रामला अटक केली आहे.

खाजगी शिक्षकांचा जीव भांडय़ात
वर्धा, १६ जून / प्रतिनिधी

सहावा वेतन आयोग केवळ शासकीय कर्मचाऱ्यांनाच लागू असल्याचा संभ्रम निर्माण करण्याच्या आदेशावर आता शिक्षण विभागाने वेतन आयोग लागू करण्याचा स्वतंत्र आदेश काढल्याने खाजगी शिक्षकांचा जीव भांडय़ात पडला आहे. शासनाच्या २७ फे ब्रुवारी व २२ एप्रिलच्या आदेशात वेतन आयोगाचे निर्देश शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने जारी केले होते. या आदेशात शिक्षकांचा उल्लेखच नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्षकांचे अर्ज फे टाळून लावले. परिणामी शिक्षकांना वेतन आयोग लागू नाही का? याविषयी प्रचंड गदारोळ उडाला. ही बाब आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांनी विधिमंडळाच्या सुरू असलेल्या सत्रात उपस्थित केल्यावर अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यावर उत्तर देताना शालेय शिक्षण विभागाने १२ जून च्या आदेशाने सहावा वेतन आयोग अमलात आला असल्याचे उत्तर दिले. हा निर्णय अनुदानित अशासकीय प्रश्नथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.