Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

सागर संशोधिका मेरी थार्प
सा गरविज्ञान हे बराच काळ पुरुषांची मक्तेदारी मानलं जात होतं. याचं कारण दीर्घकाळ सागरभ्रमंती, बरेचदा अंगावर बेतणारे प्रश्नणघातक प्रसंग. सागरावर आणि सागरजलांतर्गत करावी लागणारी शरीरकष्टाची कामं ही स्त्रियांना झेपणारी नाहीत, असं म्हटलं जात असे. त्यामुळे सागरशास्त्राशी संबंधित संशोधनात स्त्रियांना प्रवेश घेतानाच त्यांच्यापुढे अडचणीचा पाढा वाचला जायचा. त्या सागरशास्त्रात आल्याच तर त्यांना जमिनीवरची प्रयोगशाळेतली कामं दिली जायची. तरीही ज्या स्त्रियांनी सागरशास्त्रात नाव मिळवलं आणि ज्यांचा आघाडीच्या सागरशास्त्रज्ञांत समावेश होतो, त्यात मारी (किंवा मेरी) थार्प यांचं नाव अग्रभागी असतं. मेरीचे वडील अमेरिकेच्या शेती खात्यात सर्वेक्षक म्हणून काम करीत असत. अमेरिकेतील मृदांच्या वर्गीकरणानुसार वेगवेगळय़ा भूभागांचे नकाशे बनवण्याचं काम ते पार पाडीत असत. यामुळे नकाशा आरेखनाचं बाळकडूच मेरीला मिळालेलं होतं. तरीही ती वैज्ञानिक बनली ती जगाला आणि त्यातही अमेरिकेला हादरा देणाऱ्या एका महाघटनेमुळे. ही जबरदस्त घटना म्हणजे पर्ल हार्बरवर जपान्यांनी चढवलेला हल्ला. मेरीनं इंग्रजी आणि संगीत हे विषय घेऊन कलाशास्त्रातली पदवी घेतली होती. बी.ए. झाल्यावर तिला मिशिगन विद्यापीठात प्रवेश मिळाला. याचं कारण युद्धामुळे अमेरिकेतील बहुसंख्य पुरुष युद्धकार्यात योगदान देऊ लागले होते. त्यामुळे बऱ्याच विद्यापीठांना विद्यार्थी मिळण्यात अडचण येऊ लागली. याचा परिणाम म्हणजे अनेक विद्यापीठांनी पूर्वीचे स्त्रीविरोधी कायदे बदलून स्त्रियांना पदव्युत्तर शिक्षणासाठी, तसंच विज्ञानशाखेत पदवी घ्यायला परवानगी दिली होती.

न्यायिक मानववंशशास्त्र
एअर फ्रान्सच्या विमानाला अपघात किंवा घातपात होऊन सर्वच्या सर्व २२८ प्रवाशांना मृत्यू आला. त्यानंतर त्यांचे अवशेष मिळत नव्हते. ते आता अटलांटिकमध्ये मिळत आहेत. त्यात १६ मृतदेह मिळाल्याचे वृत्त आहे. तसेच विमानाचेही अवशेष, वस्तू विमानतल्याच मिळत आहेत. जे मृतदेह सुरक्षित आहेत त्यांची ओळख त्यांच्याजवळील वस्तूंवरून वा त्यांचे फोटो, पासपोर्ट इत्यादी जे पटविता येईल परंतु काहींची ओळख जलचर प्रश्नण्यांनी खाल्ल्यामुळे वा जळून गेल्याने वा कुजल्याने पटणे अशक्य होते. असाच प्रकार रेल्वे अपघात वा वन्य प्रश्नण्यांनी खाल्यामुळे वा दरोडा पडल्यावर दरोडेखोरांनी मारुन टाकून हात पाय तोडणे व शीर तोडणे हेही होऊ शकते. तसेच काही वेळा वन्य प्रश्नणीही हे खातात व फक्त हाडे वा सापळा शिल्लक राहतो. अशा वेळी विज्ञान मदतीला येते ते त्या व्यक्तीची ओळख पटविण्यास! त्यात, न्याय वैद्य तज्ज्ञ असतात. तसेच न्याय दंत तज्ज्ञ असतात. वा न्यायसाहाय्यक तज्ज्ञही असतात. याशिवाय वर शीर्षकात उल्लेखलेले मानव वंश तज्ज्ञही असतात! त्या विज्ञानाविषयी काही माहिती घेऊ यात!

‘मनकवडा’ यंत्रमानव
यं त्रमानव ज्याला आपण रोबोट असे म्हणतो त्याच्या निर्मितीत आता अधिकाधिक प्रगती होत आहे. यंत्रमानवांमुळे आज अनेक जोखमीची कामे करणे शक्य झाले आहे. विशेषत: जिथे माणसाला धोका आहे अशा ठिकाणी हे यंत्रमानव बिनदिक्कतपणे काम करू शकतात हे त्यांचे वेगळेपण आहे. अंतराळविज्ञानातील अनेक अशक्य गोष्टी यंत्रमानव विज्ञानाने साध्य झाल्या आहेत. हबल दुर्बिणीची जी दुरूस्ती अलिकडेच करण्यात आली त्यातही अशाच रोबोटिक आर्मचा वापर करण्यात आला होता. या शाखेत यंत्रमानवाचा मानवाशी असलेला संवाद अधिक सुकर व्हावा यासाठी युरोपीय वैज्ञानिकांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या मते यंत्रमानवाला आता मानवाच्या मनातील हेतू कळू लागले आहेत. यात हेतू हा शब्द नकारार्थी नाही तर मानवाला नेमके काय अपेक्षित आहे हे यंत्रमानवाला समजायला लागले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

चर्चा आणि ‘टास्क’
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गुरुवार ते शनिवार रात्री १० वाजता दाखविण्यात येणाऱ्या ‘जोडी जमली रे’मध्ये गुरुवारच्या भागात स्पर्धक विविध विषयांवर गंभीर चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धक वेगवेगळे ‘टास्क’ असलेले इंटरॅक्टिव्ह खेळही खेळणार आहेत. ‘जोडी जमली रे’मधील सहाही स्पर्धकांची एकमेकांशी चांगली मैत्री झाली असून, या आठवडय़ाअखेर या तीन जोडय़ांपैकी सर्वोत्तम जोडीचा किताब आणि बक्षीस कोणती जोडी पटकाविणार याची उत्कंठा निर्माण झाली आहे. म्हणूनच गुरुवार आणि शुक्रवारचे भाग तिन्ही स्पर्धक जोडय़ांसाठी महत्त्वाचे आहेत. या एपिसोडमध्ये स्पर्धक मुलींना एक खास फोन क्रमांक देण्यात येईल आणि त्या क्रमांकावर मुले फोन करतील. मुलाचा ज्या मुलीला फोन लागेल त्यांची जोडी जुळविण्यात येईल. या गमतीदार खेळानंतर ‘अपत्य’ या विषयावर सर्व स्पर्धक चर्चा करतील. आजही मुलगा म्हणजे ‘वंशाचा दिवा’ मानला जातो, तोच खरा कुटुंबाचा वारस असतो असे मानले जाते. मात्र आता लोकांचा दृष्टिकोन बदलतोय का? या गंभीर विषयावर स्पर्धक आपापली मते मांडणार आहेत. प्रत्येक जोडीतील दोन्ही स्पर्धक एकमेकांशी कसे सुसंवाद साधतात, त्यांच्यात समन्वय कितपत आहे हे जोखणारी धमाल फेरीही गुरुवारी पाहायला मिळणार आहे.