Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

रशियन हेलिकॉप्टर उतरले अन्..
कोल्हापूर, १७ जून / प्रतिनिधी
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन महापुराची परिस्थिती निर्माण झाली आणि पाण्याच्या वेढय़ात लोक अडकले तर त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविले जाईल, असा ठाम विश्वास भारतीय वायुसेनेच्या जवानांनी आज येथे प्रश्नत्यक्षिकाद्वारे व्यक्त केला. कदमवाडी येथील डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटलच्या आवारातील हे चित्तथरारक प्रश्नत्यक्षिक पाहण्यासाठी शेकडो लोकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

प्रश्न. शिवाजीराव भोसले यांना शाहू पुरस्कार
कोल्हापूर, १७ जून / प्रतिनिधी

प्रतिष्ठेचा समजला जाणारा यंदाचा सन २००९ सालचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रश्नचार्य शिवाजीराव भोसले यांना दिनांक २६ जून रोजी शाहू जन्मदिनी दिला जाणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून, पुरस्काराचे यंदाचे २४वे वर्ष आहे, अशी माहिती राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त बाबूराव धारवाडे, माजी कुलगुरू प्रश्न. रा. कृ. कणबरकर हे उपस्थित होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करण्याचे आंदोलन हाती घेणार - डॉ. दाभोलकर
सातारा, १७ जून/प्रतिनिधी

जादूटोणा प्रतिबंधक कायदा करण्याबाबत राज्यातील असंवेदनशील लोकशाही आघाडी सरकारने कमालीचे कातडीबचावू व पळपुटेपणाची भूमिका घेऊन अकार्यक्षता दाखवली. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डोळ्याला पट्टय़ा बांधून सत्याग्रह केला. येथून पुढे न्याय देऊ शकत नसणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले व पुढील विधानसभेत खासगी विधेयक आणणार असल्याचे जाहीर केले.

बी. जी. कोळसे पाटील यांचे गाडगेमहाराज धर्मशाळेचे विश्वस्तपद रद्दबातल
पंढरपूर, १७ जून/वार्ताहर

पंढरपूर येथील संत गाडगेमहाराज मराठा धर्मशाळेचे विश्वस्त माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे विश्वस्तपद रद्द ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निकाल लातूरचे धर्मादाय सहआयुक्त सुनील कोतवाल यांनी दिला असून, त्यांची नियुक्ती चुकीची आहे, असेही निकालात नमूद केले आहे.

शिक्षण सेवकाची नेमणूक मान्यता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर रद्द
सोलापूर, १७ जून/प्रतिनिधी

सोलापूरच्या शांतिनिकेतन प्रशालेच्या एका शिक्षण सेवकाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कायम केल्याची माहिती राज्य माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवक संघ महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
शांतिनिकेतन प्रशालेतील शिक्षण सेवक भारत रामचंद्र कटारे यांची शैक्षणिक पात्रता बी. ई. (सिव्हिल) व बी.पी.एड. असल्याने त्यांच्या नेमणुकीस आक्षेप घेण्यात आला होता.

सोलापुरात असह्य़ उकाडा
सोलापूर, १७ जून/प्रतिनिधी

सोलापूर शहर व परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने नेहमीप्रमाणे यंदाही हुलकावणी दिल्याने नागरिकांना अद्यापि उकाडय़ाचा असह्य़ त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी सायंकाळी ढग भरुन येऊन पावसाने अल्पवेळ हजेरी लावली खरी, परंतु नंतर पुन्हा उकाडा वाढल्यामुळे नागरिकांची बचैनी वाढल्याचे दिसून आले. बुधवारी दिवसभर उकाडा वाढल्यामुळे सर्वानाच पावसाची आस लागली होती. त्याप्रमाणे सायंकाळी आकाशात ढग जमा होऊन थोडय़ाच वेळात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाला प्रश्नरंभ झाला. परंतु हा पाऊस अल्पवेळ झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण न होता पुन्हा जमिनीतून धग सुरु झाली आणि उकाडा वाढल्याने अबालवृध्द नागरिक संत्रंस्त झाले. सध्या सोलापूरचे तापमान ३९ अंश सेल्सियसच्या घरात आहे.

घरफोडी व लुटमारीच्या गुन्ह्य़ासंदर्भात दोन जणांना अटक
शिरूर, १७ जून/वार्ताहर

घरफोडी व लुटमारीच्या गुन्ह्य़ासंदर्भात शिरूर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर काळुराम शेवाळे (वय २५ वर्षे, रा. रामलिंग, ता. शिरूर) व त्याचा सहकारी पवन आबासाहेब दौंडकर (वय २६ वर्षे, रा. घोटीमळा, ता. शिरूर) यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तीन दिवसांपूर्वी शेवाळे व दौंडकर शिरूर गावाबाहेर जाणाऱ्या पुणे-नगर बाह्य़मार्गावरून दुचाकीवरून जात होते. त्यावेळेस त्यांनी रस्त्याने चाललेल्या दुसऱ्या दुचाकीस्वारास अडविले, धक्काबुक्की केली.

वाळू ठेकेदाराला जिल्हा बंदीची महसूल कर्मचाऱ्यांची मागणी
कराड, १७ जून/वार्ताहर

वाळू वाहतूक करणारी वाहने चौकशीसाठी अडविल्याने महसूल कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या प्रमोद कदम (रा.पेर्ले) या वाळू ठेकेदाराला जिल्हा बंदी करण्याची मागणी महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी केली आहे. प्रश्नंताधिकाऱ्यांच्या आदेशावरून मंडलाधिकारी धनाजीराव जाधव व तलाठी संतोष जाधव यांनी तासवडे टोलनाका येथे काल वाळू वाहतूक करणारी वाहने अडविली असता प्रमोद कदम यांनी मंडलाधिकाऱ्यांना शिवीगाळ केली तर तलाठय़ास मारहाण केली. यावर उंब्रज पोलिसांत कदम याच्याविरुद्ध गुन्हा नोंद होऊन सत्वर अटक झाली. या प्रकरणी कराड तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पारवे यांच्या नेतृत्वाखाली विविध महसूल कर्मचारी संघटनांनी एकत्र येत वाळू ठेकेदार प्रमोद कदमचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यास जिल्हाबंदी करण्याची व आम्हास पिस्तुलाचे परवाने द्यावेत, अशी मागणी केली. येत्या शुक्रवारी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

‘पुणे-लोणावळा लोकल १२ डब्यांच्या कराव्यात’
तळेगाव दाभाडे, १७ जून / वार्ताहर

पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल रेल्वे गाडय़ा १२ डब्यांच्या कराव्यात व सध्याच्या लोकल गाडय़ा व डब्यांबाबत सुसूत्रता आणावी, अशी मागणी मावळ तालुका शिवसेना उपप्रमुख राजेंद्र नवले यांनी केली आहे. पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या काही लोकल गाडय़ा ९ डब्यांच्या तर काही १२ डब्यांच्या आहेत. येणारी रेल्वे लोकल गाडी किती डब्यांची आहे. याबाबत रेल्वे स्टेशनवर कोणती ही पूर्वसूचना दिली जात नाही.

सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस एक लाख सभासद नोंदणी करणार
सोलापूर, १७ जून / प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक लाख सभासदांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी सांगितले. पक्षाचे नेते तथा ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद नोंदणीचे हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा दहावा वर्धापनदिन तसेच श्री. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षाने सभासद नोंदणीचे अभियान हाती घेतले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात या अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पक्षाने आपली ताकद वाढविण्याचा संकल्प सोडला आहे.

शासनमान्य माध्यमिक शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांची संचनिश्चिती
सोलापूर, १७ जून/प्रतिनिधी

शासनमान्य अनुदानित-विनाअनुदानित-कायम विनाअनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संचनिश्चिती करण्याबाबतचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय निघाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब काळे व पुणे विभागाचे कार्यवाह मोहन पाटील यांनी दिली. संचमान्यतेमध्ये एकसूत्रीपणा, पारदर्शकता यावी या हेतूने चालू २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून संचमान्यता संगणकीय प्रणालीचा वापर करूनच करावी, असे स्पष्टपणे नमूद करून यासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी विकसित केलेल्या संगणकीय प्रणाली अमलात आणण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे श्री. काळे व पाटील यांनी प्रसिध्दिपत्रकात म्हटले आहे.

सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या रक्तदान शिबिर
महाबळेश्वर, १७ जून / वार्ताहर

शिवसेनेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त सातारा जिल्हा संपर्क प्रमुख आमदार दगडू सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पूर्व विभागाच्या वतीने शुक्रवारी (१९ जून) मेटगुताड येथे रक्तदान तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सातारा जिल्हा प्रमुख अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश शिंदे, तालुका प्रमुख हरिभाऊ सकपाळ, विधानसभा सहसंपर्क प्रमुख राजेश कुंभारदरे अध्यक्ष जनकल्याण प्रतिष्ठान पुरुषोत्तम जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात भाग घ्यावा, असे आवाहन विभाग प्रमुख राजेंद्र बावळेकर, शहर प्रमुख सुनील साळुंखे, मेटगुताड शाखा प्रमुख दत्ता बावळेकर यांनी केले आहे. वाई येथील सुप्रसिद्ध स्वामी विवेकानंद रक्त पेढीचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

अट्टल गुन्हेगार अटकेत
फलटण, १७ जून/वार्ताहर

सन १९९८ व २००२ मध्ये खून तसेच दरोडाप्रकरणी फरारी असलेला अट्टल गुन्हेगार गोविंद ऊर्फ कुंदग्या भगवान काळे (वय ३५) रा. वडले (ता. फलटण) यास फलटण पोलिसांच्या विशेष पथकाने गावातच सापळा रचून अटक केली आहे.

बालिकेवर बलात्कार
पंढरपूर, १७ जून/वार्ताहर

पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी येऊन रात्री चंद्रभागेच्या तीरावर आपल्या एक वर्षाच्या मुलीसह झोपले असता अज्ञात व्यक्तीने मुलीस उचलून नेऊन नदीपलीकडे असलेल्या उसाचे फडात तिच्यावर बलात्कार केला. मांडगाव (जि. जळगाव) येथील पती-पत्नी आपल्या एक वर्षाच्या मुलीस घेऊन पंढपूरला देवदर्शनास आले असता शनिवार रात्री ते रविवार पहाटे दरम्यान आई-वडिलांजवळ झोपलेल्या मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. पहाटे जाग आल्यावर त्यांना आपली मुलगी जागेवर नाही हे लक्षात आले. त्यांनी मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. दरम्यान नदीपलीकडे उसाच्या फडात रडण्याचा आवाज लोकांना ऐकू आल्याने लोकांनी पाहिल्यावर त्यांना तेथे लहान मुलगी असल्याचे आढळले.