Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कालिनातील क्रीडानगरीला शिवाजी महाराजांचे नाव द्या - नितेश राणे
प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील क्रीडानगरीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती

 

शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.
आपल्या निवेदनात नितेश राणे यांनी म्हटले आहे की, दिडशे वर्षाची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अनेक वास्तुंना तसेच दालनांना संत ज्ञानेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, अशा महनीय विभूतींची नावे देण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव एकाही वास्तुला नाही वा विद्यापीठांच्या वास्तुंच्या परिसरात महाराजांचा एक पुतळाही उभारण्यात आलेला नाही. सध्या विद्यापीठाच्या विद्यानगरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले असून अद्याप या संकुलाचे नामकरण झालेले नाही. या पाश्र्वभूमीवर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे उभारून संकुलाला महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानतर्फे करीत आहे. नितेश राणे यांनी आपल्या मागणीपत्राच्या प्रती राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनाही पाठविल्या आहेत.