Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

वाणिज्य शाखेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मंगळवारी निकालपत्रिका घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात गर्दी केली होती. तिथे निकालाची यादी लावण्यात आली नव्हती आणि विद्यापीठाने निकालपत्रिकाही तयार केल्या नव्हत्या. त्यामुळे आपल्याला किती गुण मिळाले आहेत हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी लांबच लांब रांग लावली होती.

मिठी नदीच्या दरुगधीवर ‘अमेरिकी ऑक्सिजन’चा उतारा
विकास महाडिक

मुंबईच्या कुशीतून कधीकाळी संथगतीने वाहणाऱ्या मिठी नदीचे पाणी पुन्हा स्वच्छ करण्याचा प्रयत्न एमएमआरडीए करणार असून या नदीतील पाणी शुध्द करताना परिसरातील दरुगधीही दूर होईल यासाठी पर्यावरणावर काम करणाऱ्या अमेरिकेतील एका प्रथितयश कंपनीला आमंत्रण देण्यात आले आहे. तसा प्रस्ताव या संस्थेकडे पाठविण्यात आला आहे, असे एमएमआरडीमधील सूत्रांनी सांगितले.

.. आणि टीव्ही चॅनल्सचे कॅमेरे फिरतच राहिले!
राघवेंद्र राव, अनुभूती विष्णोई आणि स्वाती खेर

शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी नरिमन हाऊसमधील कारवाई सुरू झाली. ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’चे (एनएसजी) महासंचालक जे. के. दत्त हे स्वत: जातीने मार्गदर्शन करीत होते. नरिमन हाऊसच्या गच्चीवर हेलिकॉप्टरमधून ‘एनएसजी’चे जवान उतरत असतानाच जे. के. दत्त यांचा ‘मोबाइल’ वाजला. पलिकडून त्यांची पत्नी बोलत होती. ‘‘ते खाली उतरत आहेत,’’ असे ती दत्ता यांना सांगू लागली. त्यावर दत्त यांनी तिला विचारले, ‘‘तुला हे कसे कळले, कसे दिसले?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘अहो, हे सर्व टीव्हीवर दिसते आहे ना!’’

घरकामगारांना हवी सुरक्षेची हमी
सुहास धुरी

मुंबईसारख्या मोठय़ा शहरात उच्चभ्रू वसाहतीतील कुटुंबे अर्थार्जन, शिक्षण वा अन्य कामांसाठी सातत्याने बाहेर असल्याने घरातील स्वच्छता, जेवण आदी कामांची जबाबदारी प्रश्नमुख्याने मोलकरीण अथवा घरगडी म्हणजेच घरकामगारांवर सोपविली जाते. हे घरकामगार ही जबाबदारी प्रश्नमाणिकपणे पार पाडत असतात. पण या घरकामगारांच्या सुरक्षिततेची हमी मात्र शासन दरबारी अद्याप घेण्यात आलेली नाही. २००८ मध्ये त्यांच्यासाठी एक कायदा करण्यात आला. मात्र त्याची अमलबजावणीच झालेली नाही. त्यामुळे हे कामगार आजही असुरक्षित जीवन जगत आहेत.

‘स्पाँज’ दाखविणार धूम्रपानाचे दुष्परिणाम
प्रतिनिधी

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी घालणारा कायदा झाला; तरी अजूनही धूम्रपान करणारे आपल्या अवतीभवती मोठय़ा प्रमाणावर आढळतात. कायद्याच्या निमित्ताने ‘पॅसिव्ह’ धूम्रपानाच्या दुष्परिणामांबाबत काही प्रमाणात जागरूकता निर्माण झालेली दिसून येते. आपल्या शेजारी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तिसमोर आपण नापंसती दर्शविली; तर त्याची दखल घेतली जाते, हे त्याचेच चिन्ह म्हणता येईल. परंतु, तरीही धूम्रपान करणाऱ्या व्यक्तिंना त्याच्या दुष्परिणामांची तीव्रता ठाऊक नसावी, म्हणूनच ते दुष्परिणाम ठाऊक असतानाही ते धूम्रपान करतात. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने ‘वर्ल्ड लंग फाउण्डेशन’ (डब्ल्यूएलएफ)च्या सहयोगाने ‘स्पाँज’ ही राष्ट्रव्यापी धूम्रपान विरोधी मोहीम हाती घेतली आहे.

..त्याने घेतलाय व्यसनमुक्तीचा वसा
प्रतिनिधी

धूम्रपान करणारी व्यक्ती धूम्रापानविरोधी पोस्टर किंवा माहितीपटांकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्याचप्रमाणे वैयक्तिक पातळीवर धूम्रपानाच्या दुष्परिणामांची कल्पना देणारे फार कमी जण असतात. बदलापूर येथे राहणारा सचिन गायकवाड या तरूणाने मात्र व्यसनमुक्तीचा वसा घेतला आहे. गेली दोन वर्षे हा एकांडा शिलेदार आर्थिक पाठबळ नसतानाही रेल्वे, शाळा, महाविद्यालये आणि पोलीस ठाण्यांमध्ये धूम्रपानविरोधी मोहीम राबवित आहे.

स्कायवॉक पेरणी
गेल्या ३१ मेपर्यंत शहरातील किमान तेरा स्कायवॉकचे काम पूर्ण करण्याची घोषणा एमएमआरडीएने केली होती. त्यापैकी एकही स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी खुला होऊ शकलेला नाही. त्याचबरोबर उर्वरित स्कायवॉकचे कामही विलंबाने होण्याचे संकेत एमएमआरडीएने दिले आहे. पावसाळ्याच्या काळात महापालिकेने रस्ते खोदण्याची परवानगी नाकारल्याने, हे त्यामागील कारण पालिकेने स्पष्ट केले आहे. ते किती खरे आणि किती खोटे हे पालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाच ठाऊक. मात्र नागरिकांच्या मनात स्कायवॉक योजनेबाबत संभ्रम वाढत आहे.

अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून
प्रतिनिधी

राज्यातील सरकारी तसेच खासगी विनाअनुदानित अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या ‘केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये’ची (कॅप) अधिसूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी १८ ते २९ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या प्रवेशप्रक्रियेत सहा स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश असणार नाही. स्वायत्त महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येणार आहे. परंतु, या महाविद्यालयांसाठी १८ ते २८ जून या कालावधीत अर्ज विक्री व अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया चालणार आहे. अभियांत्रिकीसाठी यंदा दोन लाख १६ हजार ७२५ विद्यार्थी इच्छुक आहेत.

गैरव्यवहाराविरूद्ध स्वातंत्र्यसैनिकाने थोपटले दंड!
प्रतिनिधी

शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारांत सामील न होणारे किंबहुना त्याला विरोध करणारे कर्मचारी सापडणे विरळाच, त्या उप्पर त्या संबंधाने वरिष्ठांना लेखी तक्रार केल्याची उदाहरणेही अपवादात्मकच सापडतील. पण असे अपवादात्मक धारिष्टय़ दाखविणाऱ्या प्रश्नदेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथील लिपिक पदावर कार्यरत नीलम चौहान यांना नाहक आकस आणि गळचेपीचाच सामना करावा लागला. त्यांचे ७७ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक पिता भास्कर पांडुरंग आयरे यांनी मुलीला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाच्या वाऱ्या आणि उपोषणाचाही मार्ग स्वीकारावा लागला. १९९६-९७ पासून पाठपुरावा करूनही दोषी अधिकारी निवृत्त होईपर्यंत कारवाईत जाणूनबुजून दिरंगाई केली गेली, असा आरोप केला जात आहे.

अपंग आर्थिक विकास महामंडळाची कर्जे माफ करावीत; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी

विविध महामंडळांमधून घेण्यात आलेल्या कर्जदारांची कर्जे राज्य सरकारने माफ केली, परंतु महाराष्ट्र राज्य अपंग आर्थिक विकास महामंडळाकडून अंध, अपंगांना देण्यात आलेली कर्जे माफ करण्यात आली नाहीत. ती कर्जे माफ करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली. शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, सरचिटणीस सुभाष कदम आणि संजय सुर्वे यांच्या शिष्टमंडळाने अपंग आर्थिक विकास महामंडळाची कर्जे माफ करण्याबाबत विरोधी पक्षनेते रामदास कदम यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. त्यानंतर रामदास कदम यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अलीकडे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट हे निवेदन दिले. टेलिफोन बूथधारकांचा धंदा मंदावत आहे. त्यातच मोबाइल क्रांतीमुळे दरकपात होत आहे. यामुळे अपंग संचालित टेलिफोन बूथधारकांच्या व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या बूथवर अन्य वस्तुंच्या विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणीही रामदास कदम यांनी केली.