Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

जळगाव जिल्ह्य़ातील सहा नगराध्यक्ष बिनविरोध
उर्वरित ठिकाणी रस्सीखेच
वार्ताहर / जळगाव
जिल्ह्य़ातील १२ पालिकांमध्ये नव्या नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना सहा नगराध्यक्षांची निवड अविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यात चार महिलांचा समावेश असून भाजप, शिवसेना व काँग्रेस आघाडीचे हे संमिश्र यश असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान उर्वरित सहा पालिकांमध्ये मात्र नगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच असून २० जून रोजी त्याबाबत फैसला होणार आहे. त्यातही भुसावळ पालिकेकडे जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे.

उपसा जलसिंचन योजनेतील कर्जफेड सवलतीला प्राधान्य देण्याची गरज
धुळ्याच्या आमदारांची मागणी
वार्ताहर / धुळे

खान्देश विकास कार्यक्रम पॅकेज तयार करण्यासंबंधी गठीत झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीने खान्देशातील उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांच्या कर्जफेड सवलतीच्या मागणीचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी आ. राजवर्धन कदमबांडे व आ. अमरिशभाई पटेल यांनी उपमुख्यमंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. या समितीच्या माध्यमातून या परिसरातील विकासाचा अनुशेष भरून निघणे शक्य असल्याचे कदमबांडे यांनी म्हटले आहे.

लोकनायक!
ज्याच्याशी एका शब्दाचा संवाद नाही, की कधी त्याला प्रत्यक्षात पाहिलेलेही नाही अशा माणसाच्या समर्थनार्थ पंधरा लाखाचे शहर उत्स्फूर्तपणे उभे ठाकण्याची किमया नाशिकमध्ये घडून आली, ती त्याच्या रुपात सर्वसामान्यांना तारणहार दिसू लागल्यानेच! राजकारण, समाजकारण वा लोककल्याणाच्या अन्य कुठल्या क्षेत्रात अख्खी हयात घालवणाऱ्यांच्या नशिबी सुद्धा जे भाग्य येत नाही ते नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळून जेमतेम दोन-अडीच महिने होत नाहीत, तोच विष्णुदेव विश्वनाथ मिश्रा यांच्या वाटय़ाला आले आहे.

५५ कोटीची जकातवसुली निविदा मंजूर
धुळे / वार्ताहर

महापालिकेने जकात वसुलीसाठी काढलेल्या फेरनिविदेतील तीनपैकी अहमदनगर येथील ठेकेदाराची ५५ कोटी आठ लाख रूपयांची निविदा स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. २००९-१० या आर्थिक वर्षांसाठी १ जुलैपासून जकात वसुली सुरू करण्यात येणार आहे.
सभापती सतीश महाले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली.

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गासाठी सर्वसमावेशक चळवळीची गरज
जनविकास परिषदेचा सूर

धुळे / वार्ताहर

राजकीय पक्ष आणि अनेक संघटनांनी विविध आंदोलने केली असली तरी मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाची मागणी अनेक वर्षांपासून रेंगाळली आहे. चालू आर्थिक वर्षांत मुख्यमंत्र्यांनी या मार्गासाठी अर्थसंकल्पात ५३ कोटी रुपयांची नाममात्र तरतूद केली. ही स्वागतार्ह बाब असली तरी पुरेशी नाही, असे जनविकास परिषदेने म्हटले आहे. या पाश्र्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्य़ातील सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांचा समावेश असलेली सर्वसमावेशक चळवळ उभारण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.

चोपडय़ातून स्थानिकालाच उमेदवारी देण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी
जळगाव / वार्ताहर

जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख विलास अवचट यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर आणि चोपडा येथे विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आयोजित विभागीय मेळाव्यात जिल्ह्य़ातील सर्व ११ मतदारसंघात युतीचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला. चोपडय़ात स्थानिकालाच उमेदवारी देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याने त्या जागेवरून पक्षांतर्गत विरोध उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मनसेचा टँकर भागवतो धानोऱ्याची तहान
अमळनेर / वार्ताहर

पाणी टंचाईमुळे त्रस्त असलेल्या तालुक्यातील धानोरा येथे मनसेने कार्यकर्त्यांकडून वर्गणी गोळा करीत पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला असून प्रशासकीय पातळीवर टँकर पाठविण्याचा निर्णय होईपर्यंत मनसेचा टँकर ग्रामस्थांची तहान भागविणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

..अन् अवघ्या १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण
मनमाड / वार्ताहर

आपत्कालिन यंत्रणेच्या सक्षमतेची तपासणी करण्यासाठी शहरापासून जवळच असलेल्या नागापूर येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या प्रकल्पात प्रात्यक्षिक करण्यात आले. या प्रात्यक्षिकातंर्गत टाकीतून टँकरमध्ये इंधन भरण्याच्या ठिकाणी लागलेली आग अवघ्या १५ मिनिटात यंत्रणेने विझवली. इंडियन ऑईलमधील अग्नीशमन, सहाय्यता आणि बचाव या तीन पथकातील ४० कर्मचाऱ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवित उपस्थितांची वाहवा मिळविली.

औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळविण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत - वर्षां शेडगे
धुळे / वार्ताहर

शासकीय सेवेच्या संधी मर्यादित असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळविण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी वर्षां शेडगे यांनी येथे केले. धुळे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात सिल्वासा, दमणमध्ये असणाऱ्या जय कार्प लिमिटेड कंपनीत टेक्सटाईल व प्लास्टिक विभागात रोजगार मिळण्यासाठी आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.

मालेगावात ‘पढो आगे पढो’ अभियान
वार्ताहर / मालेगाव

मुस्लिम समाजाची शिक्षणाप्रती रु ची वाढावी या हेतूने स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन या विद्यार्थी संघटनेच्या वतीने शहरात ‘पढो आगे पढो’ हे शैक्षणिक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मोहंमद सोहेल अमीर शेख यांनी याबाबत माहिती दिली.या अभियानांतर्गत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात येत आहे. त्यासाठी विविध सामाजिक संघटनांची मदत घेऊन कौटुंबिक भेटी, चौकसभा, पथनाटय़ाव्दारे शिक्षणाबद्दलची जागृती आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शेख यांनी सांगितले. या अभियानात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळवून देणे, पाच वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील शाळाबाह्य़ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, अर्धवट शिक्षण सुटलेल्यांना मुक्त विद्यापीठाव्दारे शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे यांवर भर देण्यात येत आहे. २४ जूनपर्यंत शहरभर हे अभियान राबविण्यात येणार असल्याचेही शेख यांनी सांगितले.