Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

बेकायदा बांधकामांना ग्रामपंचायतींचा हिरवा कंदील!
पुणे, १७ जून/प्रतिनिधी

ग्रामपंचायत हद्दीत तळमजला व त्यावर दोन मजली बांधकामाला परवानगी देण्याची मर्यादा असताना फुरुसुंगी ग्रामपंचायत हद्दीत बेकायदा बहुमजली बांधकामांना सर्रास परवानगी देऊन बांधकाम आराखडे मंजूर होत असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. १ एप्रिल २००८ ते २४ जानेवारी२००९ पर्यंत सुमारे ५४७ जणांना बांधकाम परवाने देण्यात आले आहेत, असे एका शासकीय अहवालातच नमूदही करण्यात आलेले आहे. अशा बांधकामांना त्वरित आळा बसवावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यानेच केली आहे.

‘भय इथले संपत नाही’
मुकुंद संगोराम

राज्यातल्या सगळ्या शहरांचे वाटोळे होत असताना डोळ्यावर कातडे ओढून बसलेल्या राज्य शासनाला जाग येण्याची सुतराम शक्यता नाही. ग्रामीण भागाचे नेतृत्व करायचे म्हणून शहरांकडे दुर्लक्ष करायचे आणि शहरात राहायचे म्हणून ग्रामीण भागाकडेही कानाडोळा करायचा, या राजकीय लोकांच्या वर्तणुकीमुळे शहरे आणि खेडी दिवसेंदिवस अधिकाधिक बकाल होत चालली आहेत. ज्या शहरांचा विकास होतो आहे, तेथील जमिनींचे भाव आकाशाला भिडत आहेत आणि त्यामुळे त्या जागांवर अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

पुणे होतंय अभियांत्रिकी संशोधनक्रांतीचे माहेरघर!
पुणे, १७ जून/खास प्रतिनिधी

पूर्वेकडील ऑक्स्फर्ड, आयटी हब असे लौकिक प्राप्त केल्यानंतर पुणे आता संगणकाधारित अभियांत्रिकी संशोधनाचेही माहेरघर बनत असून जगभरच्या आयटी कंपन्यांकडून पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांशी करण्यात येणारे करार हे त्याचेच द्योतक मानले जात आहे. या अभियांत्रिकी संशोधन क्रांतीमुळे मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रमेंटेशन अशा इतिहासजमा होण्याचा धोका असलेल्या विद्याशाखांना जणू संजीवनी मिळाली आहे.

खंबाटकी घाट टोल वसुलीला अखेर वेसण!
सुनील कडूसकर
पुणे, १७ जून

सातारा रस्ता सहापदरी करण्याच्या नावाखाली खंबाटकी घाटाजवळील टोल पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाला सरकारला मुरड घालावी लागली आहे. काम करण्यापूर्वीच त्यासाठीची करवसुली सुरु करण्याचा हा उफराटा प्रकार ‘लोकसत्ता’ने गेल्या महिन्यात उजेडात आणला होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अद्याप येथे टोलवसुली सुरूच करता आलेली नाही. खंबाटकीजवळील टोल नाका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने गेल्या १७ मे रोजी जाहीर केला होता.

प्राधिकरण कार्यालयात ‘शुकशुकाट’; नागरिक त्रस्त, कर्मचारी सुस्त
पिंपरी, १७ जून / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे पंधरा दिवसांच्या प्रदीर्घ रजेवर असल्याने सध्या कार्यालयात शुकशुकाट आहे. अधिकारी जागेवर सापडत नसल्याने नागरिक हेलपाटे मारून त्रस्त झालेत, मात्र कर्मचारी सुस्त आहेत. गेल्या दोन आठवडय़ांपासून दिवसे रजेवर आहेत. त्यांच्या गैरहजेरीत हा पदभार जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्याकडे आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात बसतात. त्यामुळे येथील नित्याच्या कामकाजावर निर्णय घेणारे अन्य अधिकारी येथे उपलब्ध नाहीत. अत्यंत तातडीचे काम असले तरच खास वाहन करून फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात येते.

तुका म्हणे ज्याला नाही गुरुभक्ती ।
त्याने भगवे हाती धरू नये ।।

संत ज्ञानेश्वरादी संतांच्या अलौकिक कार्यानंतर सुमारे दोनशे वर्षांनी महाराष्ट्रात शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी हा भागवत धर्म पुनरुज्जीवित करण्याचं महान कार्य केलं. कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे या अभंग चरणाचा ध्वनिभूत जिवंत अर्थ श्री नाथरायांच्या रूपाने अवतीर्ण झाला होता. उन्हाळ्याच्या दिवसात गोदावरीच्या तप्त वाळवंटात भर दुपारी तळमळत रडत बसलेल्या बालकाला पाहून सुमनाहूनही कोमल असणारं नाथाचं अंत:करण कळवळलं! गोदावरीच्या स्नानानं शुर्चिभूत झालेल्या नाथांनी त्या बालकाला पटकून आपल्या कडेवर घेतलं.

तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिर शताब्दी
पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या ग्रामीण व शहरी तपासणी मासिक नेत्रशिबिरांच्या शंृखलेमध्ये ५०० ते १५०० पर्यंत रुग्णांचा समावेश असायचा. मुख्यत्वेकरून चष्मेवाटप, औषधी उपचार, मोतीबिंदूसाठी शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची निवड, काचबिंदूच्या रुग्णांचा शोध असे शिबिराचे स्वरूप १९७९ सालापासून होते. त्यामध्ये १० टक्के लहान मुलांचा समावेश असायचा आणि त्यामध्ये ४-५ मुलेमुली तिरळेपणाची दिसायची. मुलींचा समावेश प्रकर्षांने जाणवायचा. मी स्वत: तिरळेपणावरील प्रशिक्षण दिल्ली येथील राजेंद्रप्रसाद इन्स्टिटय़ूट ऑफ ऑपथॅलमिक रिसर्चमध्ये प्रा. डॉ. प्रेमप्रकाश या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तिरळेपणावरील नेत्रतज्ज्ञाकडे १९७२ मध्ये घेतले होते व माझ्या खासगी व्यवसायात नियमित शस्त्रक्रिया करीत होतो.

‘कॉटन अ‍ॅण्ड स्कील पार्क’ प्रदर्शनाचे आयोजन
पुणे, १७ जून/प्रतिनिधी
व्हीलेज आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्टतर्फे देशभरातील हातमाग कामगारांनी तयार केलल्या हॅण्डीक्राफ्ट आणि हॅण्डलूम मालाचे ‘कॉटन अ‍ॅण्ड स्कील पार्क’ हे प्रदर्शन शहरात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात कारागिरांनी तयार केलल्या उत्कृष्ट कलाकुसरीची थेट विक्रीही करण्यात येणार आहे.संस्थेचे अध्यक्ष आशिषकुमार गुप्ता यांनी आज ही माहिती दिली. हे प्रदर्शन कर्वे रस्त्यावरील सोनल हॉलमध्ये १८ ते २२ जून दरम्यान सकाळी अकरा वाजल्यापासून ग्राहकांसाठी खुले होणार आहे. या प्रदर्शनात शांतीनिकेतन सिल्कसाडी, कोलकत्याची खास शाल आणि दुपट्टा तसेच ओरिसाचे पोचमपल्ला सिल्क, रॉ सिल्क, तुषार सिल्क, बिहारची मुक्ता सिल्क आदी दर्जेदार उत्पादने ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.

‘नैराश्याला बळी पडून तरुण हृदयरुग्ण होत आहेत’
पुणे, १७ जून/प्रतिनिधी
जागतिकीकरण आणि वाढत्या स्पर्धेमुळे आजचे तरुण अतिमहत्त्वाकांक्षा आणि नैराश्य या रोगांना बळी पडून हृदयरुग्ण होत आहेत, असे मत डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले.मंगला फाउंडेशनच्या वतीने डॉ. मोहन परांजपे यांनी आपल्या मातु:श्रीच्या स्मरणार्थ पंधरा जून ते पंचवीस जून दरम्यान मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचे उद्घाटन डॉ. वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी डॉ. परांजपे लिखित डोळ्यांविषयी थोडक्यात पण महत्त्वाचे या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रोटरीचे माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा लाखाचा माल चोरीस
पिंपरी, १७ जून / प्रतिनिधी
थेरगाव सोळा नंबर बस स्थानकाजवळ राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांच्या खोलीतून गुरुवारी रात्री चोरटय़ांनी एक लाख रुपयांच्या माल चोरुन नेला. परीक्षा सुरु असताना हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. िहजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोवल किसनलाल शर्मा (वय २३, रा. पेठ क्र. १३/१४, मंजालकर निवास, थेरगाव) या विद्यार्थ्यांने पोलिसांत तक्रार दिली आहे. शर्मा हा पुण्यात ‘एमबीए’चे शिक्षण घेत आहे. तो देव शर्मा व सुनील कुमार या मित्रांसमवेत तेथे राहतो. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास तो सहकाऱ्यांसह घराला कुलूप लावून टेरेसवर झोपण्यासाठी गेला होता. दरम्यान, चोरटय़ांनी कडी कोयंडा तोडून खोलीतील तीन लॅपटॉप, एक मोबाईल असा एक लाख दहा हजार रुपयांचा माल चोरुन नेला. तिघांच्याही परीक्षा सुरु असल्याने त्यांनी पोलिसांत उशिरा तक्रार दाखल केली. अधिक तपास फौजदार प्रताप भोसले करीत आहेत.

देवकी पंडित यांचे तळेगाव येथे रविवारी गायन
पिंपरी, १७ जून / प्रतिनिधी

तळेगाव येथील श्रीरंग कलानिकेतन या संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम येत्या रविवारी (२१जून) सकाळी साडेआठ वाजता वनश्रीनगर येथील संस्थेच्या सभागृहात होणार आहे. यावेळी पंडित राम माटे हे उपस्थिती असतील. अखिल भारतीय नाटय़ परिषद व श्रीरंग कलानिकेतनच्या सभासदांसाठी कार्यक्रम विनामूल्य आहे, असे अध्यक्ष विदुर महाजन यांनी कळविले आहे.

शिवराम नलावडे यांचे निधन
िपपरी, १७ जून / प्रतिनिधी

काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवराम नलावडे (वय-८५) यांचे आज सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. नलावडे हे खराळवाडीच्या वॉर्डातून निवडून गेले होते. ते पवना बँकेचे संचालक होते. शासनानाचा दलित मित्र पुरस्कार मिळाला होता. गुरुवारी सकाळी नऊ वाजता िपपरी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पुणे, १७ जून/प्रतिनिधी
ऑल इंडिया अ‍ॅन्टिकरप्शन कमिटी आणि आशियाना मित्र परिवारातर्फे नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता पहिली ते पाचवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मोफत वह्य़ांचे वाटप बंडू (अण्णा) आंदेकर, डॉ. आर.पी.जोशी, शशिकांत तापकीर, अनिल जाधव, सचिन तावरे, तुषार काकडे आदींच्या हस्ते करण्यात आले.
अॅन्टिकरप्शन समितीचे अध्यक्ष राजेश कळीमणी, सरचिटणीस सलीम शेख, गणेश देवेंद्र, अभिजित म्हसवडे, योगेश नाईक आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

‘गणेश आचार्य नृत्य अकादमी’चे उद्घाटन
पुणे, १७ जून / प्रतिनिधी

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या कोरेगाव पार्क येथील ‘गणेश आचार्य नृत्य अकादमी’ चे उद्घाटन गणेश आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी निर्माता राजू कोठारी, मयंक कोठारी, नितीशा तलवार उपस्थित होते. या अकादमीमध्ये पाच वर्षांवरील सर्वाना प्रवेश घेता येणार असून, एक, तीन व सहा महिन्यांचे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. या अभ्यासक्रमात बॉलीवूड मसाला, सालसा, चाचाचा, रम्या आदी नृत्य प्रकार शिकविले जाणार आहेत.

आर्थिक मदतीचे आवाहन
पुणे, १७ जून/प्रतिनिधी

मेंदूतील रक्तस्रावामुळे सत्यभामा फावडे मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन लाख नऊ हजार रुपये खर्च अपेक्षित असून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना दानशूर व्यक्ती तसेच स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी The Dean, PBCF KEM Hospital, Mumbai या नावाने धनादेश पाठवावेत, तसेच एमसीजीएम चार्जेससाठी पाच हजारांचा ड्राफ्ट Municipal Corporation of Greater Mumbai या नावाने पाठवावा.

‘शासनाचा आदेश येईपर्यंत डाऊ सुरूच राहणार’
पुणे, १७ जून/प्रतिनिधी
चाकणजवळील डाऊ कंपनीचा प्रकल्प जोपर्यंत राज्य शासन कंपनी बंद करण्याचे आदेश देत नाही तोपर्यंत हा प्रकल्प हलविण्यात येणार नाही, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले होते. त्याच्या विरोधात पुणे वाचवा आंदोलनातर्फे मंडई येथील टिळक पुतळ्यासमोर जाहीर सभा घेण्यात आली.या सभेत लोकायतचे नीरज जैन, अलका जोशी, मेधा थत्ते, मुक्ता मनोहर आदी उपस्थित होते. डाऊ कंपनीला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून बाहेर हाकलून लावण्यासाठी सर्व नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन या सभेत करण्यात आले.

‘नद्यांची सुरक्षितता’ या विषयावर व्याख्यान
पुणे, १७ जून/प्रतिनिधी
डेक्कन महाविद्यालयामधील पुरातत्वशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. शरद राजगुरू यांचे ‘नद्यांची सुरक्षितता’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान पत्रकारनगर रस्त्यावरील इंडिया आर्ट गॅलरी येथे २१ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

भणगे यांचे निधन
पुणे, १७ जून/वार्ताहर

कर्जत येथील सामाजिक कार्यकर्त्यां इंदिराबाई वसंतराव भणगे (वय ८६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात चार मुलगे असा परिवार आहे.