Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

राम प्रधान समितीचा अहवाल दडपण्याच्या निषेधार्थ तसेच युतीच्या आमदाराचे निलंबन रद्द करावे या मागणीसाठी ठाणे शहर जिल्हा भारतीय़ जनता पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने केली. आमदार संजय केळकर, संजय वाघुले आदी त्यात सहभागी झाले होते.

भावेंची जन्मशताब्दी भव्य प्रमाणात साजरी करणार
- आबासाहेब पटवारी

डोंबिवली/प्रतिनिधी - भाषाप्रभू पु. भा. भावे यांची जन्मशताब्दी डोंबिवलीत ‘पुलोत्सवा’सारखी धूमधडाक्यात साजरी केली जाईल, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब पटवारी यांनी ‘वृत्तान्त' मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात व्यक्त केली. पटवारी म्हणाले, भावे हे डोंबिवलीच्या सांस्कृतिक शिरपेचातील एक मानाचा तुरा होते. डोंबिवलीचे ते एक वैभव होते, पण त्यांच्या नावाने असलेल्या वास्तूची जी सध्या अवस्था झाली आहे, त्याबद्दल ठाणे ‘वृत्तांत’ने घेतलेली दखल कौतुकास्पद आहे. या विषयावर कुणीतरी बोलणे आवश्यक होते.

ओंकार हा नाभीतून घ्यायचा श्वास -डॉ. जयंत करंदीकर
ठाणे/प्रतिनिधी

मनाची आज्ञा आणि स्वत:ची कृती म्हणजे आवाज. ‘ॐ’ या स्वराचा उच्चार होताना जिभेची लुडबूड होत नाही. या उच्चारामुळे मन प्रफुल्लित होते. हा स्वर पोटातून म्हणायचा असून नाभीचा श्वास महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन अहमदनगरचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जयंत करंदीकर यांनी ‘ॐकारशक्ती स्वरसाधना’ या ‘ॐकाराकडून आरोग्याकडे..’ या विषयावरील व्याख्यानात केले.

फिलिप्स कामगार संघटनेचा आगळा आदर्श !
प्रतिनिधी

एकेकाळचा ठाणे-बेलापूर रोड हा मोठमोठय़ा औद्योगिक, उत्पादक प्रकल्पांनी गजबजलेला पट्टा. आता ठाणे- बेलापूर रेल्वे आली. रस्त्याची रुंदी खूपच वाढली. निरनिराळे फ्लायओव्हर्स आले, पण अनेक औद्योगिक उत्पादन करणारे कारखाने एकामागोमाग बंद पडत गेले किंवा आक्रसत गेले. अशातलाच एक कारखाना ऐरोलीचा फिलिप्स इंडियाचा दिवाबत्ती कारखाना.

रोहयो गैरव्यवहार:
मुरबाडचे दोन अभियंते निलंबित
शहापूर/वार्ताहर

रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मजुरांच्या नावे बोगस हजेरीपत्रक भरून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उपविभागीय अभियंता बी.एस. वैराळे व मेश्राम यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुरबाड तालुक्यातील २० रोजगार हमी योजनेच्या रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार रमेश हिंदुराव व दत्ता भोईर यांनी १८ ऑक्टोबर २००८ रोजी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

‘नोबेल आणि नोबेल पुरस्कार’ पुस्तक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे
डोंबिवली/प्रतिनिधी - ज्येष्ठ पत्रकार अनिल चक्रदेव यांचे ‘नोबेल आणि नोबेल पुरस्कार’ हे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांमधील कुतहूल वाढविणारे आणि प्रेरणा देणारे आहे. हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांने वाचले पाहिजे, असे प्रतिपादन वाचक चळवळीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पत्रप्रचारक शरद जोशी यांनी शनिवारी येथे केले.

ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्षपदी ठाणेकर
ठाणे:अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्षपदी विद्याधर ठाणेकर तर शहराध्यक्षपदी दीपक सावंत यांची निवड करण्यात आल्याची माहिती कोकण प्रश्नंताध्यक्ष माधव वैद्य यांनी दिली.
ग्राहक पंचायतीच्या जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून जिल्हा सचिवपदी केदार वालावलकर तर कोषाध्यक्षपदी राजेंद्र साळवी यांची निवड करण्यात आली आहे. शहर उपाध्यक्षपदी बाळा खोपकर, सचिवपदी सचिन गोगटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राहकांच्या काही अडचणी असल्यास त्यांनी ९८३३३९८०१२ अथवा ९८९२६३२७१३ वर संपर्क साधावा.