Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

चंद्रपूर जिल्ह्य़ात ७५ हजार सभासद नोंदणीचे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट
चंद्रपूर, १७ जून/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी अभियानाची चंद्रपूर जिल्ह्य़ात सुरुवात करण्यात आली

 

असून जिल्ह्य़ात पक्षाला अधिक बळकट करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केले. संपूर्ण जिल्ह्य़ात ७५ हजाराच्या वर कार्यकर्त्यांनी पक्षाचे सभासद करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हाध्यक्ष अरुण धोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, सेवादल जिल्हाध्यक्ष महादेव पिदूरकर, हिराचंद बोरकुटे, ओबीसी जिल्हाध्यक्ष डी.के. आरीकर, कामगार सेल जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप ढोबळे, राजीव कक्कड, दाबेराव, गणपत कुडे, धराज विरूटकर, रमेश कराळे, सुनील बावणे, किशोर भोयर, राठोड, विलास तुमाणे, प्रभाकर येरणे, प्रकाश बगमारे, राम चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. आनंद अडबाले केले तर आभार शरद मानकर यांनी मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सेवादलातर्फे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, महादेव पिदूरकर, हिराचंद बोरकुटे, वंदना आवळे, तुफानसिंह दाबोराव, डी.के. आरीकर, अनुराधा जोशी, शरद मानकर, राजीव कक्कड प्रश्नमुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दहा वर्षात जवळपास दहा राज्यात राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत, अशी माहिती दिली. तीन राज्यांमध्ये पक्ष सत्तेत आहे व अवघ्या दहा वर्षाच्या आयुष्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ७१ आमदार निवडून आणणारा जनतेच्या पसंतीचा ध्येय धोरणांवर चालणारा हा पक्ष असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या प्रयत्नामुळे शेतमालांच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ, शेतकऱ्याला ७२ हजार रुपयांची कर्जमाफी देण्याचा धाडसी निर्णय, समाजातील १२ बलुतेदारांचेही विविध महामंडळातर्फे घेतलेले कर्ज देखील माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय केवळ राष्ट्रवादी पक्षामुळे अंमलात आला, असे त्यांनी सांगितले. संचालन डॉ. आनंद अडबाले यांनी तर आभार महादेव पिदूरकर यांनी मानले.