Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गोंदियात ‘प्रहार’ संघटनेच्या कार्यकर्त्यांचे संमेलन
गोंदिया, १७ जून / वार्ताहर

‘प्रहार’ संघटनेच्या जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांचे संमेलन नुकतेच येथे झाले. ‘प्रहार’ने समाजसेवेचे

 

घेतलेले व्रत पुढेही कायम राखण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
‘प्रहार’ सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी नेहमी लढला. निवडणुकीत आम्ही पडलो याचा अर्थ हा नाही की, ‘प्रहार’ थंडावला. उलट या निवडणुकीत कोण आमच्या सोबत आहे आणि कोण नाही हे कळले.
प्रहारने समाजसेवेचे घेतलेले व्रत पुढेही सुरूच ठेवायचे आहे. यासाठी राजकीय सक्रियताही आवश्यक आहे. करिता जे गेले त्यांना विसरून पुन्हा जोमाने कामाला लागावे, असे आवाहन प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. सुमारे ३०० कार्यकर्ते या संमेलनात उपस्थित होते.
या आठवडय़ापासून जन समस्यांना घेऊन प्रहार करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
प्रहारचे जिल्हा संयोजक दिनेश मिश्रा, संघटक सुनील भालेराव, महिला प्रमुख नगरसेविका सविता इसरका, जिल्हाध्यक्ष रवी हलमारे, प्रचार प्रमुख रवी आर्य, अनिल तिवारी, राजेश मिश्रा, सुनील तिवारी, संजय जैन, राजू लिमये, दीपक बोबडे, कैलाश भेलावे, धीरज यादव, चंदन भौमिक, दिनेश बोरकर, गजेंद्र डोंगरे, प्रकाश कर्वे उपस्थित होते.