Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

खासदार राजू शेट्टी यांचा बुलढाणा येथे मंगळवारी सत्कार
बुलढाणा, १७ जून / वार्ताहर

स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांचा सस्नेह

 

जाहीर सत्कार स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांच्या उपस्थितीत येत्या मंगळवारी २३ जूनला दुपारी १२ वाजता गर्दे हॉल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
लोक कल्याण व विकासाचे मुद्दे हद्दपार करून जात, धर्म, पक्ष व पैशाच्या प्रभावाने दिशाहीन झालेले राजकारण पाहून सर्व जनता हैराण झाली असताना लोकाभिमुख, पारदर्शक व प्रश्नमाणिक कार्यकर्ते राजू शेट्टी हातकनंगले (जिल्हा कोल्हापूर) लोकसभा मतदारसंघातून मोठय़ा मताधिक्याने निवडून आले आहे.
सन २००२ साली लोकवर्गणीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेवर निवडून गेले. नंतर २००४ ला लोकांनी वर्गणी करून त्यांना शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आणलं आणि आता लोकसभेकरिता हातकनंगले मतदारसंघातून लोकांनी लोकवर्गणी करूनच खासदार निवडून आले. सध्याच्या समाजकारणातील व राजकारणाचे विविध स्तरातील लोकांची व तरुणाची भूमिका काय असली पाहिजे, या विषयावर शेट्टी यांचे येथे भाषण होणार आहे. देशातील दिशाहीन राजकारण लोकाभिमुख व प्रश्नमाणिक व्हावे, अशी इच्छा असणाऱ्या नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रश्नंताध्यक्ष सदा खोत, गजानन अमदाबादकर, संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, प्रश्न. अमर कांबळे उपस्थित राहणार आहेत.