Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दारूबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
खामगाव, १७ जून / वार्ताहर

अवैध दारूविक्रीला आळा घालावा या मागणीसाठी तालुक्यातील अटाळी येथील महिलांनी ग्रामीण

 

पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठाणेदार दारूबंदी अधिकारी, तहसीलदार यांनाही निवदेन सादर केले.
अटाळी येथे मोठय़ा प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे, तसेच शौचालयाच्या जागेवरही काहींनी अतिक्रमण करून त्याठिकाणी गावठी दारू विक्री सुरू केली. महिलांनी पुढाकार घेऊन हा अड्डा हटवला. त्यामुळे चिडून अवैध धंदे करणाऱ्यांनी महिलांना शिवीगाळ केली. याबाबतची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली.
पोलिसांनी तुकाराम बघेवार यालाच ताब्यात घेतले. इतरही आरोपींना अटक करावी, अशी मागणी महिलांनी केली.
या निवेदनात दारूविक्री करणाऱ्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. येथील दारूविक्री व अवैध धंदे थांबवावे या मागणीसाठी गावातील महिलांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. या महिलेमध्ये ग्रामपंचायत सदस्य रत्ना डिक्कर, कुसुम पुंडकर, रमा भालतिडक, मीरा मोरखडे, सिंधू कुटे, अनिता टेकाळे, कस्तुरा कोकाटे यांचा समावेश होता.
उपअधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या कार्यालयात जाऊन महिलांनी निवेदन सादर केले व दारूबंदीची मागणी केली. दारूबंदी अधिकारी, तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले आहे. ल्ल
चांदमारी भागात दगडफेक
खामगाव, १७ जून / वार्ताहर
येथील चांदमारी भागात रविवारी रात्री दगडफेकीचा प्रकार घडला. रात्री १०.०० वा. सुमारास दगडफेक सुरू झाली.
परिसरातील काही नागरिकांनी दूरध्वनीवरून याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. मध्यरात्रीपर्यंत समोरून चौकातून दगडफेक सुरू होती, असे समजते.