Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कारंजा लाडला आज शेतकऱ्यांचे धरणे
कारंजा-लाड, १७ जून / वार्ताहर

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या १८ जून रोजी कारंजा तहसील

 

कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहे. अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास, ग्राहक पंचायत, तालुका पत्रकार संघाच्यावतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना विनाविलंब कृषी विम्याची रक्कम अदा करण्यात यावी, सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्यांना प्रती हेक्टर ५ हजार आर्थिक मदत देण्यात यावी. कर्ज माफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात यावा, दुबार व तिबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित अनुदान वाटप करण्यात यावे, धडक योजनेंतर्गत १३०० सिंचन विहिरीसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करून या योजनेचा लाभ त्यांना देण्यात यावा, बँकांकडून विनाविलंब पीक कर्जवाटप करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहेत.
१८ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तहसील कार्यालय परिसरात धरणे धरण्यात येणार आहेत, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष जुगलकिशोर शर्मा, सचिव गोपाल भोयर, न्यासचे जिल्हा उपाध्यक्ष विजय काळे, ग्राहक पंचायतचे सचिव सुधीर देशपांडे, न्यासचे तालुका अध्यक्ष श्याम सवाई यांनी कळवले आहे.