Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

उपाहारगृहातून घरगुती सिलेंडर जप्त
भंडारा, १७ जून / वार्ताहर

भंडारा जिल्ह्य़ात दक्षता पथकाच्या विशेष मोहिमेत ५३ हॉटेल्सच्या तपासणीत ३० घरगुती सिलेंडर

 

जप्त करण्यात आले आहेत.
या मोहिमेंतर्गत २० केरोसिन परवाने, ६ रास्तभाव दुकाने, १२ पेट्रोलपंप, १२ इंधनवाहने, ५३ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. तपासणीत १२ पेट्रोलपंपाचे नमुने ३ वाहनातील इंधनाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरता पाठवण्यात आले आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायाकरता उपयोग करू नये. ज्या वाहनधारकांनी गॅसकीट वाहनाला लावली आहे, त्या वाहनधारकांनी अधिकृत गॅस स्टेशन मधूनच गॅस भरावा, व गॅस भरण्याची पावती किलोमीटरच्या नोंदीसह गाडीत ठेवावी. घरगुती गॅस ज्वालाग्राही असल्यामुळे स्फोट होण्याची शक्यता असते म्हणून त्याचा इंधन म्हणून उपयोग करू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.खाजगी नर्सिग होम, दवाखाने, कॅटर्स व इतर व्यावसायिकांडून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारी प्रश्नप्त झाल्या आहेत. व्यवसायाकरिता व्यावसायिक सिलेंडरचाच उपयोग करावा व अप्रीय कारवाई टाळावी. यापुढे जिल्ह्य़ात नियमित तपासण्या करण्यात येणार असून दोषी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल व ही कारवाई टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.