Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस कारावास
गडचिरोली, १७ जून / वार्ताहर

एका महिलेस सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी

 

दिल्याप्रकरणी आरोपी ऋषी डोमा भानारकर यास येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी प्रतिभा गुप्ता यांनी एक वर्षाच्या सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली.
विश्रामपूर येथील चौकात १५ जानेवारी २००३ ला ऋषी डोमा भानारकर याने वनिता दिलीप गुरनुले हिला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेमुळे व्यथित झालेल्या वनिता गुरनुले यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणी न्यायालयाने सात साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी प्रतिभा गुप्ता यांनी आरोपीस तीन महिन्याच्या सक्षम कारावासाची शिक्षा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल एक वर्षाच्या सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. मंदा फुले यांनी तर आरोपीच्या बाजूने अ‍ॅड. गोरे यांनी काम पाहिले.