Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

हिवरा आश्रमात स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्राची जोडणी !
मेहकर, १७ जून / वार्ताहर

भारतीय हवामान विभागाने विवेकानंद नगर हिवरा आश्रमात स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्राची

 

जोडणी लावली आहे. विभागीय हवामान शास्त्र केंद्र नागपूर येथील सहाय्यक हवामान शास्त्रतज्ज्ञ मुकुंद टोळे, वरिष्ठ अभियंता क्रांती बारस्कार व त्यांचे सहकारी यांनी स्वयंचलीत व उपागृह नियंत्रित पर्जन्यमापक यंत्र हिवरा आश्रमात लावले.
यावेळी आश्रमाचे सहसचिव स.ज्ञ. खाकरे, सचिव कमलेश बुधवाणी, कृषी महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. शरदचंद्र दातेराव उपस्थित होते. या उपकरणाविषयी माहिती देताना मुकुंद टोळे म्हणाले की पावसाची नोंद घेण्यासाठी स्वतंत्र निरीक्षणाची गरज नाही. प्रत्येक दिवशी प्रत्येक तासाला किती पाऊस झाला याची नोंद घेतली जाते. परस्पर उपग्रहामार्फत पुणे येथील हवामान खात्याच्या मुख्यालयाला कळवले जाते. बुलढाणा जिल्ह्य़ात असे उपकरण प्रथमच जोडण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.