Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सर्पमित्राने दिले १२० सापांना जीवदान
खामगाव, १७ जून / वार्ताहर

साप हा मानवाचा शत्रू नसून मित्र आहे, अशी जनजागृती करीत येथील सर्पमित्र नीलेश ऊर्फ गोलू

 

ठाकरे याने आतापर्यंत मण्यार, घोणस, नाग, किंग कोबरा आदी १२० हून अधिक सापांना जीवदान दिले आहे.
नीलेश ठाकूर हे १५ वर्षापासून सर्पमित्र म्हणून काम करीत आहे. वस्तीत, शेतात किंवा कोठेही साप दिसल्यास त्याला मोठय़ा कौशल्याने पकडून नीलेश ठाकूर हे सापांना ज्ञानगंगा अभयारण्यात सोडून देतात.
नुकतेच गिरीराज इंडस्ट्रीज, अकोला रोड येथे सहा फू ट लांबीचा किंग कोबरा जातीचा विषारी साप नीलेश ठाकूर यांनी पकडून जंगलात सोडून त्याला जीवदान दिले. साप हा विषारी प्रश्नणी असला, तरी पर्यावरणासाठी उपयुक्त आहे. मात्र, सर्पदंश झाल्यास मनुष्याचा मृत्यू होतो. त्या भीतीने निघाल्यास त्याला ठार मारले जाते; परंतु अलीकडच्या काळात सर्पमित्रांकडून होत असलेल्या जनजागृती व धाडसाने अनेक सापांना जीवनदान मिळाले आहे.
दोन जुगारींना अटक
जलालपुरा भागात सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर धाड टाकून पोलिसांनी दोन जुगारींना अटक केली.