Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

लंबाटोलात आरोग्य उपकेंद्राला मंजुरी
गोंदिया, १७ जून / वार्ताहर

गोंदिया तालुक्यातील लंबाटोला येथील नागरिकांना उपचारासाठी येथून दहा किलोमीटर लांब

 

असलेल्या कामठा प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत होते. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने लंबाटोला गावात आता प्रश्नथमिक आरोग्य उपकेंद्रास शासनाने मंजुरी दिली आहे.
जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या ठरावानुसार आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. आरोग्य उपकेंद्राकरिता बांधकामास प्रशासकीय मान्यता आणि पदनिर्मिती करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्याचे आमदार अग्रवाल यांनी कळवले आहे.
नागरिकांना शासकीय आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी आमदार अग्रवाल सतत प्रयत्नशील असून लंबाटोला येथील आरोग्य उपकेंद्राला राज्य शासनाने दिलेली त्याचीच फलश्रुती आहे.