Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

करवसुलीचे कंत्राट नियमबाह्य़ असल्याचा आरोप
अकेाला, १७ जून / प्रतिनिधी

अकोला महापालिकेने मालमत्ता करवसुलीचे कंत्राट देण्यासाठी सुरू केलेली प्रक्रिया नियमबाह्य

 

असल्याचा आरोप करीत, या निर्णयाचा फे रविचार करण्याची मागणी माजी नगरसेवक सुरेंद्र शाह यांनी केली आहे.
अकोला महापालिकेने मालमत्ता करवसुलीसाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रि या सुरू केली आहे. ईच्छुक संस्थेला किंवा कंत्राटदाराला वसुलीच्या रकमेनुसार टक्केवारीने हे कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार निविदा मागविण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेला माजी नगरसेवक सुरेंद्र शाह यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त गिरीधर कुर्वे यांना निवेदन सादर केले असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई प्रश्नंतिक महानगरपालिका अधिनियमानुसार करवसुली संदर्भातील अधिकार महापालिकेला कोणालाही हस्तांतरित करता येत नाहीत. करवसुलीचे अधिकार कंत्राटदाराला मिळाल्यास या अधिकाराचा गैरवापर होऊ शकतो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महापालिके क डे कर्मचारी उपलब्ध आहेत. जकात वसुलीचे कंत्राटही कोणार्क या संस्थेला देण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांकडूनच करवसुलीचे काम करून घेण्यात यावे, अशी मागणी शाह यांनी केली आहे.