Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

श्री कन्यका नागरी सहकारी बँकेची नागपूरला शाखा
चंद्रपूर, १७ जून / प्रतिनिधी

श्री कन्यका नागरी सहकारी बँकेची सहावी नवीन शाखा नागपूर येथे उघडण्याकरिता भारतीय

 

रिझव्‍‌र्ह बँकेने परवानगी दिली आहे.
महाराष्ट्राच्या उपराजधानीत बँकेची शाखा असायला हवी, अशी बँकेचे सर्व संचालक मंडळ व बँकेचे असंख्य भागधारक, ग्राहक यांची मनस्वी इच्छा होती आणि त्या अनुषंगाने बँकेचे अध्यक्ष प्रश्नचार्य डॉ. विजय आईंचवार यांच्या नेतृत्वाखाली आपली कार्य योजना तयार करून ती यशस्वीपणे राबवल्यामुळे बँकेला हे यश प्रश्नप्त होऊ शकले.
आजमितीस बँकेच्या ठेवी १३८ कोटी रुपयाच्या वर असून कर्जवाटप ६५ कोटी रुपयाच्या वर आहेत. बँकेच्या ठेवी व कर्जात झालेली वाढ ही निश्चितच बँकेचे संचालक मंडळ व बँकेची कार्यप्रणाली यावर सर्व जनतेचा विश्वास व हमी असल्याचे द्योतक असून त्यामुळेच श्री कन्यका नागरी सहकारी बँक ही विदर्भातील ‘उत्कृष्ट बँक’ म्हणून गौरवाने वाटचाल करीत आहे.
चंद्रपूर, गडचिरोलीसारख्या मागास भागात बँकेची स्थापना करून सहकारी तत्त्वावर तिची वाटचाल उपराजधानीपर्यंत आलेली असून बँकेच्या सर्व शाखा व मुख्यालय हे सर्व अद्ययावत सोयींसह ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे. बँकेचे सर्व व्यवहार हे संगणकीकृत करण्यात आले आहे. लवकरच बँकेचे व्यवहार ‘एनी व्हेअर’ पद्धतीने करण्यात येईल. भारतीय बँकेच्या निष्कर्षाप्रमाणे बँक ‘अ’ ग्रेड वर्गीकृत असून बँकेचा अंकेक्षण वर्गसुद्धा सतत ‘अ’ श्रेणी प्रश्नप्त आहे. नागपूर येथे ६वी नवीन शाखा अगदी अत्यल्प कालावधीत ग्राहकाच्या सेवेत रुजू होईल याकरिता बँकेचे अध्यक्ष प्रश्नचार्य डॉ. विजय आईंचवार, उपाध्यक्ष सखाराम पालतेवार व सर्व संचालक मंडळ प्रयत्नरत आहेत, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.एस. मुसळे कळवतात.