Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शेतकऱ्यांची पिळवणूक
बुलढाणा, १७ जून / प्रतिनिधी

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील शेतकऱ्यांना पीककर्जासाठी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण

 

बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाली. परंतु, रक्कम बँकेत जमा न झाल्याने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवरच अन्याय झाला आहे. आता खरीप हंगामासाठी पीककर्ज घेण्याकरिता सध्या शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. जामोद येथील विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेत पीककर्जासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. व्यवस्थापक शेतकऱ्यांना कागदपत्रे मागून कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. कागदपत्रे मिळाल्यानंतर आठ, दहा दिवसांनी स्वाक्षऱ्या केल्या जातात. त्यानंतर पंधरा दिवसांनी बोजा चढवून आणावयास सांगण्यात येते. त्यानंतर दहा ते बारा दिवसांनी कर्जाच्या पैशासाठी बोलाविले जाते. खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना नाहक त्रस्त करून सोडले जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.