Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘वाईल्ड वॉच’ ने दिले वन्य प्रश्नण्याला जीवदान
भंडारा, १७ जून / वार्ताहर

जागतिक पर्यावरण दिनी निसर्ग अभ्यासाचा ध्यास असलेल्या ‘वाईल्ड वॉच’ तसा कार्यकर्त्यांनी वन्य

 

प्रश्नण्यांना जीवदान देण्याचे केलेले कार्य कौतुकाचा विषय ठरला.
जंगल परिसरात निर्माण झालेल्या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे वन्यप्रश्नणी शेजारच्या गावाकडे धाव घेतात. त्यांना शिकार बनवण्याकरता अन्य वन्य प्रश्नण्यासोबतच मानवप्रश्नणी ही टपला असतो. ‘वाईल्ड वॉच’ चे सदस्य सकाळी कोका जंगल परिसरात भटकंती करीत असता नजिकच्या चंद्रपूर परिसरात त्यांना ‘भऱ्या’ तलावाच्या परिसरात एक रानगवा मृतावस्थेत आढळला तर तलावाच्या पलीकडे रानकुत्र्यांच्या तावडीत सापडलेले हरीण आढळले. हरीण जीवाच्या आकांताने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करीत होते तर शिकारी कुत्रे आपल्या शिकार कौशल्याने हरणाचे लचके तोडण्याचा प्रयत्न करीत होते. ७-८ कुत्र्यांचा समूह आणि भांबावलेले हरीण या पेचातून हरणाला सोडवण्यात सदस्यांना यश आले. सदस्यांनी तात्काळ भंडारा येथील उपवनसंरक्षक यशबीरसिंग यांना दोन्ही घटनांची माहिती दिली. जखमी हरणाला वनविभागाच्या वाहनाने पशुरुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.