Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अमरनाथ यात्रेकरिता भाविकांची पहिली तुकडी रवाना
गोंदिया, १७ जून / वार्ताहर

अमरनाथ यात्रेला प्रश्नरंभ झाला असून हिम शिवलिंगाच्या दर्शनासाठी येथील ३५ भाविकांची

 

तुकडी नुकतीच रवाना झाली.
बाबा अमरनाथ सेवा समितीच्या सदस्यांनी रेल्वे स्थानकावर या भाविकांना यात्रेकरिता शुभेच्छा दिल्या. निसर्गाच्या किमयेने वर्षातून घडणाऱ्या शिवलिंगासाठी अमरनाथ यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेला देशभरातील भाविक सहभागी होतात. गोंदिया जिल्ह्य़ातून ३५ भाविकांची पहिली तुकडी गोंडवाना एक्सप्रेसने रवाना झाली. या तुकडीत हितेश टांक, दीपक परमार, बिपीन गाडेकर, विवेक भालेराव, कविता भालेराव, सुजीत ठाकूर, नवीन परमार, वीरेंद्र आसवानी, हर्षिका वासवानी, विनोद चावडा, डी.एच. डोंगरे, तिलक लांजेवार, बिना टांक, आशा लांजेवार, धर्मेंद्र सोनछात्रा, सोनल सोनछात्रा, दुलीचंद बावनथडे, अलका बावनथडे, प्रमोद सूर्यवंशी याचा समावेश आहे. येथील बाबा अमरनाथ सेवा समितीचे चंद्रकांत पांडे, संजय टाह, दिनेश मिश्रा, अजय गौर, शैलेश गौर, पंकज पलन, मनुला चव्हाण, घनश्याम सोलंकी, नगरसेवक व्यंकट पाथरू, आनंद सूर्यवंशी आदींनी भाविकांच्या तुकडीला शुभेच्छा दिल्या.