Leading International Marathi News Daily

गुरुवार, १८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

चिखलीत दुधाचा तुटवडा
चिखली, १७ जून / वार्ताहर

जून महिना अर्धा संपूनही पावसाचे आगमन झाले नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोक

 

चिंताग्रस्त झाले आहेत. गाई-म्हशीच्या वैरणाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने दुधाची चणचण जाणवू लागली आहे. बाहेरच्या शहरातून आयात होणारे दूध देखील कमी प्रमाणात येऊ लागल्याने दुधासाठी व्यावसायिकांची भटकंती होत आहे.
तलाव, नद्या व विहिरी कोरडय़ा पडल्याने मुक्या प्रश्नण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. वैरण देखील मिळत नाही. पाऊस कधी येणार व हिरवा चारा कधी मिळणार ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. वैरण व पाण्याअभावी गाई-म्हशीच्या दुधात लक्षणीय घट झाली असल्याने ग्रामीण भागातून शहरात दररोज येणाऱ्या हजारो लिटर दुधात कमतरता आली आहे. जळगाव श्रीरामपूर येथून आयात होणाऱ्या पॅकींग दुधात देखील घसरण झाल्याने चहा विक्रेत्यासह दही-ताक व दुधापासून बनणाऱ्या खाद्य पदार्थाची टंचाई भासत आहे.