Leading International Marathi News Daily
गुरुवार । १८ जून २००९
  एव्हरेस्ट अणि अस्मिता
  ओपन फोरम
स्वयंपाक करायला आवडतं का?
  ग्रूमिंग कॉर्नर
करिअर कन्फ्युजन
  थर्ड आय
नवीन शिक्षण पद्धती, श्रीमंती की..?
  मेल बॉक्स
  स्मार्ट बाय
  क्रेझी कॉर्नर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं ‘पिकॉक’
  यंग अचिव्हर्स
वेल बिगनइज हाफ डन्
  यंग अचिव्हर्स
‘मला कार्डिऑलॉजिस्ट व्हायचंय!’
  ब्यूटी कॉर्नर
दंतचिकित्सा : फक्त काही क्षणात

ओपन फोरम
स्वयंपाक करायला आवडतं का?
'स्वयंपाक घरात फक्त स्त्रीचीच मक्तेदारी' हे समीकरण संजीव कपूरमुळे काहीसं मागे पडू लागलं आणि पुरूषही या क्षेत्रात येऊ लागले. काही जण आवड म्हणून तर काही जण व्यवसाय म्हणून! पण मुलं स्वयंपाकघरात येऊ लागली तशा मुली स्वयंपाकघरातून काढता पाय घेऊ लागल्या. आणि यावरूनच आजच्या तरूणाईला स्वयंपाक करायला किती आवडतं याचा घेतलेला कानोसा..

अक्षय कासाळकर (दहावी)
जेवण बनवायची मला हौस आहे. आई जेवण बनवत असताना मी बघतो आणि बघता बघताच शिकलो. वेगवेगळया नविन गोष्टी शिकायला मला आवडतात. चिकन मला अगदी व्यवस्थित बनवता येतं. घरचेही मी केलेले पदार्थ आवडीने खातात. पण मी केलेला मेदूवडा मात्र कोणालाच आवडत नाही.

अवंती पवार (इलेक्ट्रॉनिक इंजिनियर)
मला जेवण बनवायला भरपूर आवडतं. त्यातही टीव्हीवर, मॅगझिनवर येणाऱ्या रेसिपीज ट्राय करायला आवडतात. त्यात एक वेगळीच मजा असते. जेवण तसं मला आईनेच शिकवलं. आठवीपासूनच मी जेवण बनवायला लागले. मी बनवलेला गाजराचा हलवा सर्वाना आवडतो. अशी कोणतीच गोष्ट नाही जी बनवायला येत नाही.

निकीता अपराज (बी.एम. एम.)
जेवण बनवायचा मला प्रचंड कंटाळा येतो. कधी गरज वाटलीच तर जेवण बनवते. पण मुलींनीच का म्हणून करावं? मुलांनीही हातभार लावावा. आम्ही नाही का बाहेर जाऊन काम करत आणि एकदा केलं तर ते गळ्याशी येतं. म्हणून मी शक्यतो जेवण बनवायचा कंटाळा करते.

आशिष बांघर (बी.कॉम.)
मला तर अजिबात स्वयंपाक येत नाही. कारण तशी कधी वेळच आली नाही. आई घरीच असते, त्यामुळे तीच जेवण बनवते आणि जर पुढचा विचार केला तर आम्ही दोघेही कमवते असू. जेवण बायकोच बनवेल आणि जर कधी तिला कंटाळा आला तर हॉटेल्स आहेतच. स्वयंपाक आलाच पाहिजे याची मला गरज वाटत नाही.

शरद पवार (सहाय्यक अभियंता - बीएसटी)
जेवण बनवायची हौस आहे म्हणून जेवण बनवतो असं नाही. पण जी कामं मुलं करतात ती आज मुलीही करतात. मग मुलींची काही कामं मुलांनी केली तर काय झालं? माझी मोठी बहिण अभ्यासामुळे हॉस्टेलला असताना लहान बहिणीला जेवणात मदत करता करता मीही जेवण करू लागलो. विविध प्रकारचे फोडणीचे भात मला अगदी छान करायला येतात. पण भाकरी काही अजून व्यवस्थित जमत नाही.