Leading International Marathi News Daily
गुरुवार । १८ जून २००९
  एव्हरेस्ट अणि अस्मिता
  ओपन फोरम
स्वयंपाक करायला आवडतं का?
  ग्रूमिंग कॉर्नर
करिअर कन्फ्युजन
  थर्ड आय
नवीन शिक्षण पद्धती, श्रीमंती की..?
  मेल बॉक्स
  स्मार्ट बाय
  क्रेझी कॉर्नर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं ‘पिकॉक’
  यंग अचिव्हर्स
वेल बिगनइज हाफ डन्
  यंग अचिव्हर्स
‘मला कार्डिऑलॉजिस्ट व्हायचंय!’
  ब्यूटी कॉर्नर
दंतचिकित्सा : फक्त काही क्षणात

ग्रूमिंग कॉर्नर
करिअर कन्फ्युजन

नुकतेच रिझल्ट लागले आहेत! आता एखादा कोर्स ठरवून त्यात करिअर घडवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
हा काळ मुलांसाठी फार गुंतागुंतीचा असणार याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या मुलांचे पालक, नातेवाईक, मित्र आणि त्यांचे हितचिंतक त्यांना त्याचं करिअर निवडण्यात मदत करायला फारच उतावीळ असतील.
एका बाईने तिच्या मुलीच्या करिअरबद्दल सल्ला घेण्यासाठी मला फोन केला होता. त्या मुलीने (वय वर्ष २१) आयआयटीमधून ग्रॅज्युएशन केलं होतं. आता तिच्यासमोर दोन पर्याय होते. एक तर अहमदाबादमधून आयआयएम करणं किंवा

 

अमेरिकेत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत केमिकल इंजिनीयरिंग करणं. मी विचारलं की, त्या मुलीचं प्राधान्य कशाला आहे. आईचं लगेच उत्तर आलं, हा निर्णय घ्यायला ती खूप लहान आहे.
२१ व्या वर्षी निर्णय घ्यायला ती लहान आहे? भारतात आपण १८ व्या वर्षी लग्न करायला परवानगी देऊ शकतो, पण २१ हे वय करिअर ठरवण्यासाठी मात्र लहान आहे. अजून एका अशाच गोंधळलेल्या आईने मला फोन केला. तिच्या मुलाने कोणत्या कॅटरिंग कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्यावी, ‘अ’ की ‘ब’ हे तिला कळत नव्हतं. मी म्हटलं की दोन्ही कॉलेजेस उत्तमच आहेत. त्यामुळे फार काही फरक पडत नाही. पण ती इतकी कोडय़ात पडली होती की तिला वाटलं, तिच्या मुलाला एकाच कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली असती तर अशी निर्णय घेण्याची वेळ आलीच नसती.
कॉलेज किंवा करिअर निवडण्यात जो गोंधळ उडतो तो कमी करण्यासाठी मी काही विचार तुमच्यासमोर मांडणार आहे.

पालकांनो, तुमच्या मुलांना काय करावंसं वाटतं ते शोधून काढा आणि ते करण्यासाठी त्यांना मदत करा. जितक्या लवकर ते स्वत:चे विचार मांडू शकतील, स्वत: निर्णय घेऊ शकतील तितकंच ते तुमच्यासाठी आणि मुलांसाठी चांगलं आहे.
तणावमुक्त व्हा. तुमच्या मुलांनी करिअरबाबतीत चुकीची निवड केली असेल तरी हा जगाचा शेवट नाही. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही तुमचं करिअर बदलू शकता. बॉलीवूडमधले प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक शंकर- एहसान- लॉय यातील शंकर महादेवन आधी सिलीकॉन व्हॅली, कॅलिफोर्निया इथे आयटी करीत होता. केसरी टूर्सचे सर्वेसर्वा केसरी पाटील आधी एका गावातल्या शाळेत शिक्षक होते. अशा किती तरी व्यक्तींना मी भेटलोय ज्यांनी त्यांचं करिअर बदललं आणि आता त्यांच्या क्षेत्रात त्यांनी उंच शिखरं गाठली आहेत आणि आता जग देखील बदलतंय. १० वर्षांपूर्वी आपण कॉल सेंटर्सची अपेक्षा केली होती का? अमेरिका आणि युरोपमध्ये आर्थिक मंदी येईल आणि लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील याची अपेक्षा केली होती का? दर आठवडय़ाला टेक्नॉलॉजी बदलत असते. सध्याच्या काळात तुम्ही कायमस्वरूपी करिअर कसं निवडू शकता?
मुलांना काही ध्येय नाही किंवा मुलं त्यांच्या करिअरकडे दुर्लक्ष करतात अशी तक्रार करू नका, गुलाब फुलण्यासाठी आपण त्याची कळी जबरदस्तीने उघडत नाही. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते.
शेवटी मुलांनो, तुमचं करिअर तुमच्या आवडीवर, तुमच्या गुणांवर आणि छंदावर आधारलेलं असू दे. पैसा, प्रसिद्धी, क्षेत्रातला वाव आणि त्या क्षेत्राचं भविष्य यावर तुमची निवड अवलंबून नसावी. कारण सध्याच्या काळात आपलं आयुष्य हे करिअरभोवतीच फिरत असतं. कामाचे दिवस किंवा आठवडे हे न संपणारे असतात. कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल फोन आपल्या घरीही चालू असतात. सुट्टीवर गेलो तरी एकीकडे काम चालूच असतं. या स्पर्धेच्या युगात आपले सगळे कष्ट, वेळ आणि हुशारी आपल्या नोकरीतच जातात. त्यामुळे तुम्ही करिअर म्हणून जे काही निवडाल ते तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे, नाही तर लवकरच तुम्ही या स्पर्धेत होरपळून निघाल आणि तुमचं आयुष्य तणावमुक्त कधीच नसेल. तेव्हा ऑल दी बेस्ट.. तुम्ही यशाचं सर्वोच्च शिखर गाठावं हीच इच्छा!
डॉमिनिक कोस्टाबीर
अनुवाद : यशोदा लाटकर
dominiccostabir@yahoo.com