Leading International Marathi News Daily
गुरुवार । १८ जून २००९
  एव्हरेस्ट अणि अस्मिता
  ओपन फोरम
स्वयंपाक करायला आवडतं का?
  ग्रूमिंग कॉर्नर
करिअर कन्फ्युजन
  थर्ड आय
नवीन शिक्षण पद्धती, श्रीमंती की..?
  मेल बॉक्स
  स्मार्ट बाय
  क्रेझी कॉर्नर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं ‘पिकॉक’
  यंग अचिव्हर्स
वेल बिगनइज हाफ डन्
  यंग अचिव्हर्स
‘मला कार्डिऑलॉजिस्ट व्हायचंय!’
  ब्यूटी कॉर्नर
दंतचिकित्सा : फक्त काही क्षणात

क्रेझी कॉर्नर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं ‘पिकॉक’
दुपारची वेळ होती. गोडधोड जेवल्यामुळं मराठीचा अंमळ डोळा लागला होता. नेहमीप्रमाणे आजही ती दरवाजा ओढून घ्यायला विसरली होती. आपल्या घरात कोणी चोरी करणार नाही असा तिचा ठाम विश्वास होता. तिच्या या विश्वासाचा फायदा घेऊन अनेक शेजारीपाजारी तिच्या घरात ‘हात’ मारायचे. पाचेक मिनिटांची डुलकी झाल्यावर तिला आपसूक जाग आली. तोंडावर पाणी मारून तिने वर्तमानपत्र डोळ्यापुढे धरले. ‘आयसीएल खेळाडू बॅक टू

 

बीसीसीआय, ‘काश्मीर सीमेवर सीझफायर’ अशी शीर्षके वाचून तिला अस्वस्थ वाटू लागलं. आपल्याला नेमकं काय होतंय हे तिच्या लक्षात येईना. घोटभर पाणी प्यायल्यावर ती थोडी सावरली. दुपारच्या वेळी वेगवेगळ्या वाहिन्यांवरच्या मालिका पाहाव्यात असा विचार तिने केला. कोणत्या तरी मराठी वाहिनीवर मालिका चालू होती. ती लक्षपूर्वक मालिका पाहू लागली. छोटय़ा पडद्यावर कोणती तरी सासू-सूनेची मालिका चालू होती. मालिकेतील सून प्रत्यक्षात सासूबाईंसारखी म्हातारी दिसू लागली होती, तरीही मालिकेचं ‘कवित्व’ अजून संपलं नव्हतं. नवरा-बायकोचे संवाद ऐकू येत आहेत.
पती- हे काय, अजून तू रेडी झाली नाहीस? वुइ हॅव टू रिच देअर बाय सिक्स थर्टी. अँड नाऊ इट इज सिक्स फिफ्टीन. इट्स रिडिक्युलस.
पत्नी- मला का उशीर झाला हे मला विचारू नकोस. आस्क युवर मॉम.
पती- मॉम? काय केलं तिनं?
पत्नी- दॅट ओल्ड फेलो आस्कड् मी टू मेक स्नॅक्स फॉर हर फ्रेंड्स. मी नाही म्हटलं असतं तर त्यांनी मी त्यांचं काहीच ऐकत नाही, असा आरडाओरडा केला असता. मग बनवत बसले त्यांच्यासाठी कांदापोहे. तुला जरा कळू दे.
हॉलिवूडच्या डेली सोपमध्ये कलाकार मधूनमधून मराठी बोलत आहेत. असं तिला वाटलं.
वैतागून ‘मराठी’ नं दुसरा कार्यक्रम लावला. एका वाहिनीवर गाण्यांची स्पर्धा चालू होती. ‘धिस इज माय फेव्हरिस्ट साँग. थँक यू व्हेरी फॉर सिंगिंग इट’ निवेदिका गायकाला सांगत होती. गायकही ’थँक यू’ चं पालुपद लावत होते.
आता मात्र ‘मराठीला चांगलंच अस्वस्थ वाटू लागलं. तिच्या अंगाला दरदरून घाम सुटला. त्या निवेदिकेला तिला म्हणावंसं वाटलं. ‘तुझ्या फाडफाड इंग्रजीवर हजार वेळा टाळ्या वाजवेन. पण बाई जरा मातृभाषेत बोल. तुमच्यासारखी कलाकार मंडळी मातृभाषेत बोलणं विसरू लागली तर नव्या पिढीला मराठीतल्या सहस्त्रावधी शब्दांचा खजिना कळणार तरी कसा. इंग्रजीत शिका पण मातृभाषा जिवंत ठेवा. त्या पं. हृदयनाथजींकडं बघा. त्यांच्यासारखा एवढा मोठा माणूस वाद्यवृंद, धन्यवाद यासारखे शब्द वापरतो. माय मरो पण मावशी जगो असं म्हणतात.
पण ही पुतना आंटी, तुमच्या आईच्या जिवावर उठली आहे. अर्थात यात तिचा काय दोष आहे. तुम्हीच तिला मदत करताहात. ‘एकाही मालिकेत मला अस्सल मातृभाषा ऐकू येत नाही. यात कलाकार म्हणतील, लेखक लिहणार ते आम्ही बोलणार पण तुम्ही संवादात इंग्रजी ‘टू मच’ होतंय. एवढं तरी लेखक, दिग्दर्शकाला सांगा ना.’ मनातलं बोलून टाकल्यावर तिला जरा बरं वाटलं. ती व्हरांडय़ात आली. शेजारच्या कुलकण्र्याच्या घरातून ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ हे गाणं ऐकू येत होतं. कुलकर्णीची नात आजीला विचारत होती. मी हे गाणं इंग्रजीत म्हणू.’ आजीनं कौतुकानं ‘हो’ म्हणून सांगितलं.
‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं पिकॉक’ नातीनं गाणं सुरू केलं. आजीचा उर भरून आला. मराठी मात्र व्हरांडय़ातच मटकन खाली बसली.
चंद्रहास मिरासदार
cm.dedhakka@gmail.com