Leading International Marathi News Daily
गुरुवार । १८ जून २००९
  एव्हरेस्ट अणि अस्मिता
  ओपन फोरम
स्वयंपाक करायला आवडतं का?
  ग्रूमिंग कॉर्नर
करिअर कन्फ्युजन
  थर्ड आय
नवीन शिक्षण पद्धती, श्रीमंती की..?
  मेल बॉक्स
  स्मार्ट बाय
  क्रेझी कॉर्नर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं ‘पिकॉक’
  यंग अचिव्हर्स
वेल बिगनइज हाफ डन्
  यंग अचिव्हर्स
‘मला कार्डिऑलॉजिस्ट व्हायचंय!’
  ब्यूटी कॉर्नर
दंतचिकित्सा : फक्त काही क्षणात

यंग अचिव्हर्स
वेल बिगनइज हाफ डन्
शमाच्या मते सामाजिक जाणीव असली तर या क्षेत्रात आपण मनापासून काम करु शकतो. वाचनाची, त्यातही सामाजिक विषयांवरील लेख वाचण्याची शमाला विशेष आवड आहे. अधिकारी वर्ग सामान्यांच्या जवळ जात नाही. याची तिला खंत वाटते. अधिकाऱ्यांनी गावपातळीवर प्रत्यक्ष जाऊन तिथल्या लोकांशी संपर्क साधला पाहिजे. पाहाणी केली पाहिजे असं तिला मनापासून वाटतं.
राज्यात एमपीएससीच्या परीक्षेत आपण पहिले आलो आहोत यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आनंदाने बेशुद्धच पडायची बाकी होते. रिझल्ट कळताच मुख्य परीक्षा आणि मुलाखत डोळ्यासमोर तरळून गेली.. ’ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात पहिली आलेली शमा ढोक-पवार उत्साहात सांगत होती. स्पर्धात्मक परीक्षेसाठी कशी जी-तोड मेहनत करावी लागते ते इथे नव्याने सांगण्याची गरज नाही. एवढं मोठं यश मिळून मेहनत सार्थकी लागल्याचा आनंद आणि समाधान काय असतं हे तिच्याशी बोलताना जाणवत होतं.
शमा सध्या नायब-तहसीलदार या पदावर कार्यरत आहे. ही नोकरी करता करताच तिने एमपीएससीची तिसऱ्यांदा परीक्षा दिली. खरं तर तिला प्राध्यापक व्हायचं होतं. तिला शिकवायला खूप आवडतं. हॉर्टिकल्चर या विषयात बी.एसी. करत असताना तिने

 

तेच मनाशी ठरवलं होतं. पण ग्रॅज्युएशन झाल्यावर या स्पर्धा परीक्षांबद्दल तिला कळलं आणि स्वभावानुसार हे आव्हान पेलायला ती तयार झाली. स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटली की बहुतेकांचा कल आधी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आयएएस होण्याकडे असतो. शमानेही आधी तोच मार्ग निवडला. यूपीएससीचे तीन अटेम्प्ट दिले. पण त्यात यश आलं नाही. मग तो अभ्यास करता करताच तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचं ठरवलं. हा तिचा निर्णय योग्य ठरला!
अभ्यास करताना सुरुवातीला अर्थातच प्रचंड मेहेनत घ्यावी लागते. ते सांगताना ती म्हणते की, रोजचं एक वृत्तपत्र वाचताना सुरुवातीला मला एक तास लागायचा. ही परीक्षा देताना एमपीएससीचा पेपर कसा असतो याचा खूप बारकाईने अभ्यास करणं गरजेचं असतं. हा अभ्यास केल्यावर मात्र आता मी पंधरा मिनिटात एक वृत्तपत्र वाचू शकते. त्यातलं काय वाचायचं काय नाही ते पटकन कळतं.
ग्रॅज्युएशन होईपर्यंत शमाला या परीक्षेबद्दल फारशी माहिती नव्हती. पण तिच्या कॉलेजमध्ये काही अधिकारी गेस्ट लेक्चरर म्हणून येत असतं. त्यांच्याशी बोलताना तिला या क्षेत्राची माहिती झाली आणि त्यातून त्या क्षेत्राबद्दलचं आकर्षणही निर्माण झालं. शाळा-कॉलेज मध्ये कायम टॉपर आणि कृषी विद्यापीठात दुसरी आलेल्या शमाकडे स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी हुशारी होतीच. त्याला तिने नियोजनबद्ध मेहनतीची साथ दिली आणि यश खेचून आणलं.
शमाचे पती सुशीलकुमार पवार हे देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. हा अभ्यास करता करताच खरं तर दोघांची ओळख झाली. पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना हवा तसा वेळ अभ्यासासाठी देता येत नाही.
या नोकरीबद्दल बोलताना ती म्हणते की, सामाजिक जाणीव असली तर या क्षेत्रात आपण मनापासून काम करु शकतो. वाचनाची, त्यातही सामाजिक विषयांवरील लेख वाचण्याची शमाला विशेष आवड आहे. अधिकारी वर्ग सामान्यांच्या जवळ जात नाही. याची तिला खंत वाटते. अधिकाऱ्यांनी गावपातळीवर प्रत्यक्ष जाऊन तिथल्या लोकांशी संपर्क साधला पाहिजे. पाहाणी केली पाहिजे असं तिला मनापासून वाटतं. नियम, कायदे केवळ कागदोपत्री राहतात. पण ते अंमलात आणण्यासाठी मेहनत करावी लागते असं तिला वाटतं. आपल्या ऑफिसमध्ये मदतीसाठी वा काही काम घेऊन येणाऱ्या कोणत्याही सामान्य व्यक्तीला हेलपाटे घालावे लागणार नाहीत, याची काळजी घेईन, असा मानस तिने व्यक्त केला. तरुणांच्या म्हणजेच भावी पिढीच्या हातात उद्याचा समाज आहे असं म्हटलं जातं, शमाने या अपेक्षांचं योग्य ते प्रतिनिधित्व केलं आहे. आणखी यश मिळवण्यासाठी तहसीलदाराचं पद तिला खुणावतं आहे.
नमिता देशपांडे