Leading International Marathi News Daily
गुरुवार । १८ जून २००९
  एव्हरेस्ट अणि अस्मिता
  ओपन फोरम
स्वयंपाक करायला आवडतं का?
  ग्रूमिंग कॉर्नर
करिअर कन्फ्युजन
  थर्ड आय
नवीन शिक्षण पद्धती, श्रीमंती की..?
  मेल बॉक्स
  स्मार्ट बाय
  क्रेझी कॉर्नर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं ‘पिकॉक’
  यंग अचिव्हर्स
वेल बिगनइज हाफ डन्
  यंग अचिव्हर्स
‘मला कार्डिऑलॉजिस्ट व्हायचंय!’
  ब्यूटी कॉर्नर
दंतचिकित्सा : फक्त काही क्षणात

यंग अचिव्हर्स
‘मला कार्डिऑलॉजिस्ट व्हायचंय!’

कॉलेजमधील एकही ‘डे’ मी मिस केला नाही. मज्जाही केली व तसा अभ्यासही केला. 'Don’t believe in ur luck, believe in ur worship'असं शगुन म्हणते. ‘पहली बार कॅमेरा के सामने गई, चारो तरफ से फ्लॅश फ्लॅश और सिर्फ फ्लॅश। येसा लगा के में एक दिन मे स्टार बन गई'। असं म्हणत शगुनने आपला आनंद व्यक्त केला. रविवारी सी. ई. टी. चा रिझल्ट होता. सर्व मुले गॅसवर.. पण या वेळीही बाजी मारली ती मुलींनीच. शगुन शाहने मेडिकल अभ्यासक्रमातील सी. ई. टी. मध्ये २०० पैकी १९९ मार्क मिळवत राज्यातून पहिली येण्याचा मान मिळवला.

 

मोबाईलवर सतत खणखणणारे फोन .. त्यांना उत्तर देताना आनंदाश्रू टिपणारी आजी.. आणि घरात फोटो व इंटरव्ह्य़ू घेणाऱ्यांची रांग असा शगुनने खूप मजेत रविवार घालवला.
'अभ्यास खूप केला होता पण पहिली येईन असं कधीच वाटलं नव्हतं, बहोत अच्छा लग रहा है। , I can’t believe it', असं ती भरभरुन बेालत होती. सी. ई. टी. झाली पुढे काय? असं विचारल्यावर ते सगळं ठरवून ठेवलंय, मला कार्डिऑलॉजिस्ट व्हायचंय. त्यासाठीच मी सी. ई. टी. मध्ये मेडिकल हा विषय घेतला. एम. बी. बी.एस. हा एकच ऑप्शन खुला न ठेवता मी महात्मा गांधी महाविद्यालय, डी. वाय. पाटील आणि अनेक प्रायव्हेट सेक्टर मधील वेगवेगळ्या परीक्षाही दिल्या. त्यातही मला चांगले मार्क मिळतील, हे ती आत्मविश्वासाने सांगत होती.
'मी आठ तास मस्त झोपत होते. अभ्यास मी ब्रेक घेत घेतच केला. दोन ते तीन तासांनी मी टीव्ही पाहायचे, गाणी ऐकायचे, फोनवर गप्पा मारायचे पण अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यास. अभ्यासाचा ताण असायचा पण त्याचं रुपांतर टेन्शन मध्ये कधीच झालं नाही.
शगुनचे बाबा इंजिनीयर व आई शिक्षक आहे. तरीही शगुन मेडिकलकडे का वळली असं विचारलं असता, मला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं आहे. लहानपणी 'डॉक्टर, डॉक्टर' खेळतानाचं डॉक्टरकीट अजूनही माझ्याकडे आहे. त्या आठवणीत ती रममाण होते.
आई-वडिलांनी तर खूप सहकार्य केलं, पण त्याचबरोबर जयहिंद कॉलेज मधील विपुल सर, हर्षद सर, गुरे मॅम, वेंगसरकर सरांनी माझ्याकडून खूप मेहनत करुन घेतली. त्यामुळे माझ्या यशात त्यांचाही वाटा निश्चितच आहे, हे ती मनापासून सांगते.
कॉलेज मधील एकही 'डे' मी मिस केला नाही. मज्जाही केली व तसा अभ्यासही केला. 'Don’t believe in ur luck but believe in ur worship' असं ती म्हणते.
मी माझ्या वयाच्या मुलांसाठी आयडियल ठरलेय. या आनंदापुढे मला गगनच ठेंगणं वाटतंय, 'इस हसीन पल को मैं कभी भूल नहीं पाऊंगी' हे म्हणताच तिचे डोळे पाणावले. या सर्वातून तिच्या स्वरातील आनंद लपत नव्हता.
स्वप्नाली देसाई
swapnalidesai077@gmail.com