Leading International Marathi News Daily
गुरुवार । १८ जून २००९
  एव्हरेस्ट अणि अस्मिता
  ओपन फोरम
स्वयंपाक करायला आवडतं का?
  ग्रूमिंग कॉर्नर
करिअर कन्फ्युजन
  थर्ड आय
नवीन शिक्षण पद्धती, श्रीमंती की..?
  मेल बॉक्स
  स्मार्ट बाय
  क्रेझी कॉर्नर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं ‘पिकॉक’
  यंग अचिव्हर्स
वेल बिगनइज हाफ डन्
  यंग अचिव्हर्स
‘मला कार्डिऑलॉजिस्ट व्हायचंय!’
  ब्यूटी कॉर्नर
दंतचिकित्सा : फक्त काही क्षणात

ब्यूटी कॉर्नर
दंतचिकित्सा : फक्त काही क्षणात

WHO (जागतिक आरोग्य संघटना) या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले की, योगा व ध्यान याप्रमाणेच Designer आणि Instant smile makeover म्हणजेच योजनापूर्वक केलेला सुशोभित आणि हसरा चेहरा या नवीन तंत्रज्ञानामुळेही लोकांचे आयुष्य बदलले आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाची, करिअरची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्या प्रकृतीची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. हल्ली बऱ्याच प्रमाणात वाढलेली मसाज पार्लर्स, स्पा, ब्युटी अ‍ॅण्ड स्कीन सेंटर्स,

 

फिटनेस सेंटर्स यांच्यामागोमाग आलेला नवीन पायंडा म्हणजे फक्त एका सीटिंगमध्ये Instant smile makeover. पूर्वी फक्त प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या व्यक्ती आपले हास्य आकर्षक असावे यासाठी प्रयत्नशील असायच्या, परंतु आता सर्व थरांतील व्यक्ती आपले बोलणे व हास्य अधिक मोहक कसे होईल याची दखल घ्यायला लागल्या आहेत.
Dentzz Dental Care Centers ची पेडर रोड व लोखंडवाला येथे ही सेंटर्स चालू झाली आहेत. डॉ. शंतनू जराडी हे या संस्थेचे व्यवस्थापक असून त्यांच्या म्हणण्यानुसार या तंत्रज्ञानामुळे दातांमधल्या विविध त्रुटी काही तासांत दूर केल्या जातात. खूप जवळ जवळ असलेले डागाळलेले व पिवळे पडलेले दात काही तासांतच नीट केले जातात.
दातांचा आकार, लांबी, रूंदी तसेच दोन दातांमधील फट कमी करून तुमचे हास्य अधिक मोहक बनविण्यासाठी या अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या एका सीटिंगनंतर दातांची विशेष काळजी घेण्याची गरज भासत नाही. नियमितपणे दोन वेळा दात घासणे आणि आपल्या डेंटिस्टकडे नियमित तपासणीसाठी जाणे एवढे केले तरी पुरे.
यामुळे आपला पैसा, वेळ व त्रास खूप कमी होतो. आपले हास्य हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जे आपला आत्मविश्वास वाढविण्यास कारणीभूत ठरते. ज्याप्रमाणे आपण मसाज व फेशियल करतो त्याचप्रमाणे smile makeover चा अनुभव घेऊन आपले हास्य व व्यक्तिमत्त्व अजून आकर्षक, मोहक बनवा.