Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

व्यापार-उद्योग

केंद्रातील नव्या सरकारकडे ‘आयएमसी’चा १०० दिवसांचा कृती आराखडा सुपूर्द
व्यापार प्रतिनिधी: केंद्रातील नव्या सरकारकडे ‘इंडियन र्मचट्स चेंबर (आयएमसी)’ने एक १०० दिवसांच्या अवधीचा कृती आराखडा सुपूर्द केला असून त्यावर त्वरित अंमलबजावणी अपेक्षित आहे. हा आराखडा आर्थिक धोरणातील सुधारणांच्या ब्लूप्रिंटवर आधारित आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची नवी दिल्लीत आयएमसीचे अध्यक्ष गुल कृपनानी आणि मुख्य सल्लागार पी. एन. मोगरे यांनी भेट घेऊन हा कृती आराखडा अलीकडेच सादर केला. कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, उत्पादन आणि पर्यावरण या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये धोरणातील काही विशिष्ट उपाय योजनांवर अंमलबजावणी करण्याची आयएमसीने शिफारस करण्यात आली आहे.

ग्वालियर केमिकलच्या रासायनिक व्यवसायाचे लॅन्क्सेसकडून संपादन
व्यापार प्रतिनिधी: स्पेशालिटी केमिकल्स ग्रुप लॅन्क्सेस एजीची उपकंपनी लॅन्क्सेस इंडिया प्रश्नयव्हेट लिमिटेडने ग्वालियर केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे रासायनिक व्यवसाय आणि संपत्तीचे संपादन ८२.४ दशलक्ष युरोंच्या मोबदल्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मफतलाल समूह कॉर्पोरेट गिफ्ट व्यवसायात
व्यापार प्रतिनिधी: अरविंद मफतलाल समूहाची मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड शाळेचे गणवेष आणि कॉर्पोरेट गणवेश यांचे उत्पादन वाढविणार. तसेच कंपनीने कॉर्पोरेट गिफ्ट व्यवसायातही प्रवेश केला आहे.

व्यावहारिक लवचिकता प्रदान करणाऱ्या स्वयंसेवांच्या मागणीत भारत आघाडीवर
व्यापार प्रतिनिधी: बझबॅक मार्केट रिसर्च संस्थेने एनसीआर कॉर्पोरेशनसाठी स्वयंसेवी सेवांच्या मागणीबाबत अलीकडेच एक जागतिक ग्राहक सर्वेक्षण केले होते त्यात भारतीय ग्राहकांनी दक्षिण आफ्रिकेतील ग्राहकांच्या जोडीने जगात पहिले स्थान पटकावले आहे. एटीएम, किऑस्क, इंटरनेट आणि मोबाईल यासारख्या मल्टीचॅनेल स्वयंसेवी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कंपन्यांशी संवाद साधण्याची मागणी हा या सर्वेक्षणाचा विषय होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ९७ टक्के भारतीयांनी मल्टीचॅनेल स्वयंसेवा सुविधा देणाऱ्या कंपन्यांसोबत व्यवसाय करण्यासच प्रश्नधान्य देण्याचे मत प्रदर्शित केले.

व्यापार संक्षिप्त
बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडची इंटरनेट आधारित ‘एसआयपी’ सुविधा

व्यापार प्रतिनिधी: म्युच्युअल फंड ग्राहकांसाठी ऑनलाईन गुंतवणुकीची सोय उपलब्ध करण्याच्या हेतूने बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडातर्फे ‘आयएसआयपी’ नावाची गुंतवणूक सुविधा म्हणजेच इंटरनेट आधारित सिस्टीमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लान सुरू करण्यात आला आहे.

‘सॉफ्टप्रश्ने’चा दक्षिण आफ्रिकेतील ‘क्युरा’ या कंपनीवर ताबा
व्यापार प्रतिनिधी: सुमारे १४० कोटी रु.चे बाजारपेठीय भांडवल असलेल्या सॉफ्टप्रश्ने सिस्टीम्सने ‘क्युरा रिस्क मॅनेजमेंट सॉफ्टवेअर लिमिटेड साऊथ आफ्रिका’ (क्युरा)वर अंदाजे १९ दशलक्ष यूएसडी रोख रक्कम देऊन १०० टक्के ताबा मिळवला. या संपादनामुळे एखाद्या नवीन कंपनीचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा मैलाचा दगड सॉफ्टप्रश्नेने पार केला आहे. क्युरावर ताबा मिळवून सॉफ्टप्रश्नेने भक्कम पाया तयार केला असून त्याच्या आधारे या क्षेत्रात आघाडी मिळवणे त्याला शक्य होईल आणि मार्च २०१० पर्यंत त्याचा महसूल सहापटींनी म्हणजे ६० कोटी रु.हून अधिक वाढेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे जीआरसी- (प्रशासन, धोका आणि कायदा) मध्ये जागतिक स्तरावर आघाडी मिळवणे सॉफ्टप्रश्नेला शक्य होईल.

आयडीबीआय गिल्ट्सचे जी. ए. तडस नवे एमडी व सीईओ
व्यापार प्रतिनिधी: आयडीबीआय बँकेने आपली संपूर्ण अंगिकृत कंपनी आयडीबीआय गिल्ट्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून जी. ए. तडस यांची प्रतिनियुक्तीलारे नेमणूक जाहीर केली आहे. गेली १४ वर्षे ते आयडीबीआय बँकेच्या सेवेत असून कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी अ‍ॅण्ड प्लॅनिंग, पुण्यातील कॉर्पोरेट बँकिंग शाखेचे प्रमुख व अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर त्यांनी काम पाहिले आहे. एम.ए. (अर्थशास्त्र), एमबीए (फायनान्स) आणि सीएआयआयबी अशी अर्थशास्त्र आणि वित्त क्षेत्राची तडस यांना शैक्षणिक पाश्र्वभूमी आहे.

जागतिक मराठी चेंबरचे नव्या कार्यालयात स्थलांतर
व्यापार प्रतिनिधी: जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे कार्यालय दादर येथे स्थलांतरित करण्यात आले असून नवीन कार्यालयाचा पत्ता खालीलप्रमाणे आहे. खासदार मनोहर जोशी यांचे संपर्क कार्यालय, रुक्मिणी निकेतन, दुसरा मजला, रानडे रोड, पोस्ट ऑफिसजवळ, दादर (प.), मुंबई- ४०००२८. जागतिक मराठी चेंबरचे अध्यक्ष मनोहर जोशी हे मुंबईत असताना कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत किंवा पूर्वनियोजित भेटीची वेळ निश्चित करून सभासद वरील कार्यालयात भेटू शकतील.