Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

‘सेनेत फूट पाडून पक्ष ‘हायजॅक’ करू इच्छिणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले’
शिवसेना वर्धापनदिनानिमित्त विशेष मुलाखत

युतीच्या शासनाने केलेल्या विकासकामांचे, सुरू केलेल्या प्रकल्पांचे दान युतीच्या पदरात पडले नाही, याची खंत तर वाटतेच पण त्याचवेळेस २६/११ च्या घटनेनंतरही शहरी भागातील, विशेषत: मुंबईतील मतदार कॉँग्रेसलाच मते देतात याचे आश्चर्यही वाटते असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेवर आजपर्यंत शहरी पक्ष असा शिक्का होता, शेती-शेतकरी आणि त्यांच्या समस्या याविषयी सेनेला माहिती नाही आणि आस्थाही नाही असे चित्र होते. लोकसभेच्या निवडणुकीत एकीकडे शहरातून सेना उखडली गेली तर दुसरीकडे ग्रामीण भागात सेना हातपाय पसरते आहे असे चित्र निर्माण झाले. या पाश्र्वभूमीवर शहरातील पकड ढिली होत असल्याचे लक्षात आल्याने तुम्ही जाणीवपूर्वक ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले का, असे विचारले असता उद्धव ठाकरे यांनी नकारार्थी मान हलवत, आमचा शहरी भागातला अति आत्मविश्वास नडला असे प्रामाणिकपणे मान्य केले.

पवारांची ‘भाकरी’
‘भाकरी फिरविली नाही तर करपते,’ असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढल्याने पक्षाच्या आमदारांमध्ये साहजिकच अस्वस्थता निर्माण झाली आहे. विधानसभेत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे पवारांनी संकेतच दिले आहेत. परंतु पवारांच्या काही आवडत्या ‘कॅच फ्रेजेस’ आहेत त्यापैकीच ही भाकरी फिरविण्याची उपमा आहे. त्यांचा समाजवादी काँग्रेस पक्ष राजीव गांधी यांच्या काळात काँग्रेस पक्षात सामील झाला, तेव्हापासून म्हणजे सुमारे २५ वर्षे पवार तीच भाकरी तव्यावर फिरवित आहेत. आता तव्याखालचे निखारेही विझले आहेत. पण पावर मात्र आजही तीच भाकरी फिरविताना दिसत असल्याने तोही एक विनोदाचा मुद्दा त्यांच्याच पक्षात झाला आहे.

राष्ट्रवादीची पकड घट्ट
सतीश कामत

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी रत्नागिरी हा राजकीयदृष्टय़ा जागरूक व संवेदन्ांशील मतदारसंघ मानला जातो. भाजपच्या माजी आमदार कै. कुसुमताई अभ्यंकर यांनी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख निर्माण केली आणि त्यांच्यानंतर कै. शिवाजीराव गोताड यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. १९९५ च्या निवडणुकीत राज्यामध्ये भाजप- सेना युती सत्तेवर आली. त्यावेळी तर कोकणात भगवी लाट निर्माण झाली होती. १९९९ मध्ये युतीची सत्ता गेली, पण रत्नागिरीची जागा भाजपने अजिंक्य राखली. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र भाजप- सेना युतीमध्ये बिघाडी झाली आणि जिल्ह्यात चिपळूण- सावडर्य़ापर्यंत जम बसवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने रत्नागिरी तालुक्यातही यशस्वी शिरकाव केला.

स्वबळावर लढण्याचे जाहीर मतप्रदर्शन नको
प्रदेशाध्यक्षांचा विलासरावांना इशारा!
मुंबई, १८ जून / खास प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असे मत काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि बाळासाहेब विखे-पाटील यांनी मांडले असले तरी हे या नेत्यांचे वैयक्तिक मत आहे. या विषयावर कोणीही जाहीर मतप्रदर्शन करू नये, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज नेतेमंडळींना बजावले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री विलासराव देशमुख हे तर सातत्याने तशी मागणी करीत आहेत.