Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘डाटा एंट्री’ ऑपरेटरअभावी ऑनलाईन माहिती भरताना अडचणी
हिंगोली, १८ जून/वार्ताहर

जिल्ह्य़ात रोहयोअंतर्गत ग्रामपंचायत कामाच्या हजेरी पत्रकाची ऑनलाईन माहिती भरण्यासाठी

 

नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये ‘डाटा एंट्री’ ऑपरेटर ऐवजी लेखापाल व सेवकांचा समावेश आहे. त्यामुळे अचूक माहिती भरण्यात मोठय़ा अडचणी येणार असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात चालू आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. संगणकावर माहिती भरण्याचे काम ‘डाटा एंट्री’ ऑपरेटर यांनाच जमते. त्यामुळे ‘डाटा एंट्री’ ऑपरेटरची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली. सुमारे १२ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तयांचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने काढले आहेत. मात्र यामध्ये काही सेवक व कंत्राटी लेखापालाचाही समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना ‘डाटा एंट्री’ची माहिती नसल्यामुळे माहिती ऑनलाईन माहिती भरताना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची चर्चा आहे.