Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

धनगर समाजाकडून राज्य सरकारचा निषेध
पिंपरी, १७ जून / प्रतिनिधी

 

धनगर समाजाचा मागास प्रवर्गात समावेश करावा, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ पिंपरी- चिंचवड शहर धनगर समाजाने आज राज्याचे आदिवासी कल्याण व विकास मंत्री विजयकुमार गावित यांचा धरणे आंदोलनातून निषेध केला. या वेळी राज्य सरकारचाही धिक्कार करण्यात आला.
पिंपरी येथील अहिल्यादेवी होळकर पुतळा चौकात आयोजित या आंदोलनात मंत्री गावित यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. गावित यांनी, हा समाज या प्रवर्गास पात्र नसल्याचे म्हटल्याने त्यांना ‘शहर बंदी’चा इशारा या वेळी देण्यात आला. प्रवर्ग बदलण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा , अशी मागणी या वेळी करण्यात आली.
या आंदोलनात समाजाचे शहर अध्यक्ष राजू दुर्गे यांच्यासह बाळासाहेब वाघमोडे, बबन मदने, धनंजय तानले, राजेंद्र घोडके,लक्ष्मण रुपनर,सदाशिव पडळकर,रमेश लबडे, मोहन पाटील, जितेंद्र मदने, सुनील नवले, राजाभाऊ दन्ने भाऊसाहेब हरनावळ,विष्णू सायगुंडे, अनुराज दुधभाते, बापू वायकुळे, बाळासाहेब वायकुळे, जगन्नाथ भिरडकर, संजय कवितके, सोनाताई गडदे, दिलीप गुळदगडे, अभिमन्यू गाडेकर, परमेश्वर गोफणे आदींसह दीडशेवर कार्यकर्ते सहभागी झाले होते.