Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

सहा ऋतूंचे सात सोहळे
शुभांगी पासेबंद

अरेच्च्या आत्ता आत्ता तर आपण उन्हाळा आला म्हणून कुरकुर व कुर्र-कुर्र (पापड-कुरडय़ांतील) केली आणि बघा उन्हाळा संपतसुद्धा आला. ऋतुचक्राचे कूस पालटणे कळलेच नाही. सहा ऋतूंवर आपण प्रेम करीतच असतो, पण तरीही ऋतूंबद्दल मित्रमैत्रिणींनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारला तर खरेखरे उत्तर द्याल? बघा हं! खोटे बोलायचे नाही. विचारू?

ठाण्यासाठी नवे कलासंकुल
संजय बापट

अलीकडच्या काळात मुंबईतील मध्यमवर्गीय उपनगरांकडे सरकू लागल्यापासून ठाण्याची नवी ओळख ‘डॉमॅटरी सिटी’ अशी होऊ लागलीय. वेगवेगळ्या भाषा आणि प्रश्नंतातील लोकांची ठाण्यातील संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने राज्याच्या सांस्कृतिक उपराजधानीची ओळखही बदलू लागली आहे. त्यातच नागरिकांची सांस्कृतिक भूकही वाढत आहे. परिणामी सतत ‘हाऊसफुल्ल’ राहणारे गडकरी रंगायतन आज रसिकांची भूक भागविण्यात कमी पडू लागले आहे.

एक दुर्लक्षित साहित्यसेवक- जनार्दन ओक
प्रशांत असलेकर

साहित्याच्या क्षेत्रात वाचकप्रिय लेखकांची एक वेगळी वर्गवारी आहे. त्यात सुहास शिरवळकर, बाबा कदम, रामचंद्र सडेकर, कुमुदिनी रांगणेकर, गुरुनाथ कुलकर्णी इत्यादी लेखक मोडतात. या लेखकांच्या कादंबऱ्या घटनांनी भरलेल्या असतात. त्यात विचारमंथनाला, चिंतनाला जागा नसते. चोखंदळ वाचक या लेखकांच्या वाटय़ाला फारसा जात नाही, पण या लेखकांची पुस्तके आवडीने वाचणारा एक वेगळा वाचकवर्ग आहे; ही गोष्ट नाकारता येणार नाही. हा वर्ग विशेषत: गृहिणींचा, नवसाक्षरांचा आणि ग्रामीण भागातला असतो. महाराष्ट्रातले एकही वाचनालय या लेखकांची पुस्तके ठेवल्याशिवाय चालू शकत नाही.

खांदा दुर्मिळ झालाय..
आत्माराम नाटेकर

खांदा. केवळ दोन अक्षरी शब्द. कोणतेही ओझे वाहणारा महत्त्वाचा घटक. याच खांद्यावरून प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यासाठी खांदाही तितकाच मजबूत आणि बळकट हवा. आयुष्यभर साथ करणारा हा खांदा प्रत्येकाच्याच कामी येत असतो. तो जसा दुसऱ्यासाठी द्यावा लागतो, तसाच दुसऱ्याचाही आपल्यासाठी घ्यावा लागतो. आयुष्याच्या अखेरची यात्रा अशाच कोणाच्या तरी खांद्यावरून निघालेली असते. शरीराचा अविभाज्य भाग असलेला हा खांदा इतर इंद्रियांच्या मानाने मात्र कायमच उपेक्षित राहिला.

अ‍ॅन्टेनाबद्दल भारत सरकारचे बोटचेपे निकष
‘निवासी इमारतींवरील मोबाईलच्या अ‍ॅन्टेना धोकादायी?’ या शीर्षकाचा माझा लेख ‘लोकसत्ता’च्या ‘रविवार वृत्तान्त’मध्ये १ मार्च २००९ रोजी प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर माझे मित्र भारत सरकारचे रिटायर्ड वायरलेस अ‍ॅडव्हायझर अशोक मु. जोशी यांनी मला ई-मेल पाठवून भारत सरकारने या संदर्भातील निकष त्यांच्या दूरसंचार खात्याच्या वेबसाईटवर दिलेले आहेत असे कळविले. हे निकष जारी करताना भारत सरकारने मोबाईल फोनसेवक कंपन्यांना खूपच सवलती दिल्या आहेत.

नव्या उमेदीची संगीत संध्या
सदाशिव बाक्रे

श्रीगणेश कल्चरल अ‍ॅकॅडमी या ठाणे येथील संस्थेने नुकतीच ७ जून रोजी सहयोग मंदिर येथे ‘तरुणाई संगीत संध्या’ आयोजित केली होती. नवी उमेद व नवी आशा घेऊन येणाऱ्या तरुणाईसाठी श्रीगणेश कल्चरल अ‍ॅकॅडमीने हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध हार्मोनियमवादक अनंत केमकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर अ‍ॅकॅडमीच्या प्रमुख डॉ. मंजिरी देव, श्रीराम देव व मुकुंदराज देव हेही याप्रसंगी उपस्थित होते. पहिला कार्यक्रम बेळगावच्या श्रीधर कुलकर्णी यांच्या गायनाचा झाला.

देवभूमी- फोंडा
सदाशिव टेटविलकर

श्री मंगेशी देवस्थान, श्री शांतादुर्गा, श्री नागेश्वर अशी अनेक प्रश्नचीन मंदिरे ही फोंडा शहर आणि आसपासच्या परिसरात आहेत. कालिका, दुर्गामाता आणि शैव- वैष्णव मंदिरांच्या विपुलतेमुळे ही देवभूमी किंवा हिंदू देवतांचे शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने गोमंतकालीन हिंदू लोकांत स्वातंत्र्याची, स्वराज्याची बीजे रोवली गेली, ज्यामुळे पुढे ‘स्वामींचे राज्य देव ब्राह्मणांचे विश्रामस्थान’ या तत्त्वाने भारले जाऊन डिचोली, मणेरी, साखळी, सत्तर, फोंडे येथील देसाई स्वराज्य कार्यात उतरले.

स्क्रीन रायटर्स लॅब
भारतीय सिनेमाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ अर्थात एन. एफ. डी. सी. तर्फे विविध उपक्रम राबविले जातात. एन. एफ. डी. सी. ने ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये अशा दोन टप्प्यात ‘स्क्रीनरायटर्स लॅब २००९’चे आयोजन केले आहे.
या उपक्रमाला बिंगर फिल्मलॅब, लोकानरे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एण्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा आदी संस्थांनी सहकार्य केले आहे. पटकथाविषयक प्रशिक्षण देणाऱ्या ‘स्क्रीन रायटर्स लॅब २००९’ या कार्यशाळेत पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट बाजारपेठेच्या दृष्टीने पटकथाकार त्यांच्या मूळ भारतीय संहितांवर काम करतील. हा पहिला टप्पा ८ ते १२ ऑगस्ट दरम्यान लोकानरे (स्वित्र्झलड) येथे होईल. या कार्यशाळेचा दुसरा टप्पा गोव्यात २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान होणार आहे. उदयोन्मुख आणि होतकरू पटकथाकारांना हे उत्तम व्यासपीठ एन. एफ. डी. सी. ने उपलब्ध करून दिले आहे. पटकथाकारांनी या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आपले अर्ज writer@nfdcindia.com या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन एन. एफ. डी. सी. तर्फे करण्यात आले आहेत.
प्रतिनिधी