Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

विदर्भ साहित्य संघ विरुद्ध अखिल भारतीय साहित्य महामंडळ यांच्यातला वाद म्हणजे किमान सूत्र असलेली बतावणीही नाही, तर तो आहे एक अकारण उभ्या केलेल्या प्रतिष्ठेचा बाऊ!
या वादाला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला ‘अभिजन विरुद्ध बहुजन’ असा तो वाद असल्याचे सकृतदर्शनी तरी जाणवत होते. नंतर मात्र, हा वाद असा काहीही नसून संस्थेच्या हिताच्या नावाखाली दोन्ही बाजूंनी केवळ वैयक्तिक प्रतिष्ठेपोटी सुरू केलेली ती चिखलफेक आहे, हे स्पष्ट झाले. आमच्या घरासमोर क्रिकेटचे ग्राऊंड आहे. तेथे शाळकरी मुले क्रिकेट खेळतात आणि सकाळ-संध्याकाळ हृदयविकाराच्या भीतीने किंवा फिटनेससाठी तिशी-पस्तीशी पार केलेली माणसं मैदानाला चकरा मारण्याचा व्यायाम करतात. परवा मैदानावरच्या दोन मुलांमध्ये वाद सुरू होता. दोन्ही मुले नागपूरकर असल्याने त्यापैकी अर्थातच एकजण हिंदीत बोलत होता!
- मी काय सांगतो तिकडे तू लक्षच देत नाहीस..

महानगरातील चित्रपट प्रेमींना आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची अपूर्वाई राहिलेली नाही. गेली ८/१० वर्षे पुण्यात, गोव्यात, मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरत आहेत. कोलकाता, चेन्नई, त्रिवेद्रम, बेंगलोर येथेही ते भरत असतात. फिल्म सोसायटी चळवळीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने फिल्म सोसायटींच्या फेडरेशनचे अध्यक्ष श्याम बेनेगल यांनी ‘महानगरांच्या बाहेर आंतरराष्ट्रीय चित्रपट न्या,’ असा संदेश दिला होता. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर जिल्हा पातळीवर ज्या फिल्म सोसायटय़ा आहेत त्यांची सभासद संख्या गेली कित्येक वर्षे २००-२५० च्या आसपास आहे. तेथील चित्रपट रसिकांना जर आंतरराष्ट्रीय चित्रपटांची ओळख करून द्यायची तर उत्सवप्रिय मराठी मनाला ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवां’चा अनुभव द्यायला हवा हे लक्षात घेऊन कोल्हापूर, सोलापूर, नागपूर या तीन महत्त्वाच्या शहरात छोटे आंतरराष्ट्रीय चित्रपट भरवायला हवेत, अशी योजना मांडली. फेडरेशनने त्याला मान्यता दिली, त्या शहरातील तिन्ही फिल्म सोसायटय़ांनी ही जबाबदारी मोठय़ा उत्साहाने स्वीकारली.

कमलाक्षरं
कमलाक्षरं हे कमल शेडगे यांचं तिसरं पुस्तक.परवाच्या १८ जूनला ते तयार झालं. उद्याच्या २२ जूनला शेडगे ७५व्या वर्षांत पदार्पण करताहेत, त्यानिमित्तानं ‘कमलाक्षरं’ला प्रशांत दळवी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. एक क्षेत्र आणि त्यात अनेक व्यक्ती हे समीकरण आपल्या ओळखीचं आहे. पण एक क्षेत्र आणि त्यात आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहोर उठवणारी एकमेव व्यक्ती हे सूत्र मात्र अगदी क्वचितच अनुभवायला मिळतं. मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात तब्बल ४५ र्वष ज्यांच्या अक्षरसाम्राज्यावरचा सूर्य अस्तास गेला नाही, अशी एकमेवाद्वितीय व्यक्ती म्हणजे अक्षरसम्राट कमल शेडगे! नेपथ्य हे नाटकाचं पहिलं स्टेटमेंट आहे असं म्हणतात. कारण पडदा उघडताक्षणीच ते नाटकाची शैली कोणती आहे याविषयी भाष्य करतं. पण आपल्या मराठी नाटकांच्या बाबतीत पडदा उघडण्यापूर्वीच हे भाष्य होतं. कारण आधी पेपरमधलं नाटकाचं पान उघडलं जातं, आणि त्या पानावरच्या प्रत्येक जाहिरातीतल्या शीर्षकलेखनातून आधी कमल शेडगे आपल्याशी त्या नाटकाविषयी बोलतात आणि मगच ते नाटक प्रेक्षकांशी संवाद साधतं. अर्थात कमल शेडगेंचं शीर्षकलेखन हे नवीन येणाऱ्या मराठी नाटकाचं पहिलं भाष्यकार ठरतं! नाटकाची नाडी जाणून घेऊन त्या-त्या नाटकाची प्रकृती सांगणारा, प्रेक्षक आणि मराठी नाटकामधला म्हणूनच हा मोठा ‘अक्षरदुवा’ ठरला आहे.

कुठलीही चूक नसताना जे २०० लोक मारले गेले वा जखमी झाले, त्यांच्याप्रतीही आमची जबाबदारी ही होतीच. मृत्यूच्या थैमानात बळी पडणं, हाच त्यांचा दैवदुर्विलास म्हणता येईल का? जे मारले गेले, त्यांना पैशाची मदत जरी देण्यात आली, तरी त्यानंतर मात्र त्यांची आपुलकीने चौकशी अभावानेच झाल्याचेही या चौकशीदरम्यान लक्षात आले आहे. गेल्या आठवडय़ात प्रत्येक वर्तमानपत्रातील रकानेच्या रकाने हे राम प्रधान समितीच्या अहवालासंबंधीच्या बातम्यांनी भरून वाहत होते. राज्य सरकारने हा अहवाल गुप्त राखून जनतेसमोर न आणण्याचे आता निश्चित केले आहे. यामुळे आधीच या अहवालाबाबत निर्माण झालेल्या वादाच्या ज्वाळांमध्ये अधिकच तेल ओतल्यासारखे झाले आहे.


नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान काही राज्यांमध्ये नक्षलवाद्यांनी अत्यंत भीषण असे हल्ले चढविले. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यांचा बीमोड करण्यासाठी कठोर पावले उचलली जात नाहीत असे चित्र निर्माण होत आहे. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या राज्यांमध्येही नक्षलवादाने धुमाकूळ घातला आहे. दुसऱ्या बाजूस छत्तीसगड, झारखंडमध्ये गेल्या आठवडय़ात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालून शासन यंत्रणेस नामोहरम केले आहे. या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी कोणत्या प्रकारे प्रभावी उपाययोजना करायला हवी, याचे विश्लेषण करणारा हा लेख.