Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

‘टेन्गशेच्या स्वप्नात ट्रेन’!
‘काही वर्षांपूर्वी मुंबईत एका मतिमंद मुलीवर ट्रेनमध्ये बलात्कार झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीनं सर्वत्र खळबळ माजली होती. मीही ती बातमी वाचून भयंकर अस्वस्थ झालो होतो. पुढे ही घटना बराच काळ माझा पाठलाग करत राहिली. त्यावर आधारीत ‘टेन्गशेच्या स्वप्नात ट्रेन’ नावाची एक कथा मी २००२ सालच्या एका दिवाळी अंकात लिहिली होती. प्रा. सिद्धिविनायक टेन्गशे हा ४५ वर्षांचा मध्यमवर्गीय प्राध्यापक या कथेचा नायक होता. अर्थातच तो बुद्धिजीवी होता.

तंत्रज्ञान
विद्यार्थी आणि उपग्रह

वैज्ञानिक अभ्यासासाठी अवकाशात उपग्रह सोडणे ही बाब आता नित्याची झाली आहे. विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी हे उपग्रह अवकाशात सोडणे आवश्यकही आहे. त्यातच भारताला मिळालेल्या ‘चांद्रयान-१’च्या यशानंतर देशातील प्रत्येकाला अवकाश संशोधनासंदर्भात उत्सुकता वाटायला लागली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव विद्यार्थ्यांवर पडला आहे. यामुळे उपग्रह निर्मितीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ
मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् या विभागातर्फे दोन वर्षांचा ‘मास्टर ऑफ थिएटर आर्टस्’ हा पूर्ण वेळ चालणारा पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविला जातो. या अभ्यासक्रमात प्रामुख्याने अभिनय, नाटय़दिग्दर्शन, नाटकाची तांत्रिक अंगे, नाटय़वाङ्मय व नाटय़इतिहास, नाटय़निर्मिती व त्यातील सहभाग, नाटय़लेखन, नाटय़समीक्षा आदी विषय शिकविले जातात. या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे या अभ्यासक्रमात सिद्धांत व प्रात्यक्षिकांचे प्रमाण ४० ते ६० टक्के असे जाणीवपूर्वक ठेवण्यात आले आहे.

रोजगाराभिमुख नाटय़शास्त्र विभाग
बदलत्या जगाचा वेध घेऊन अभ्यासक्रमात पूरक परिवर्तन करणे आणि काळानुरूप नवे अभ्यासक्रम सुरू करणे, हे ध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अंगीकारले आहे. हेच धोरण अवलंबून विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाने रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अलीकडे ‘लोकल टू ग्लोबल’ हे ब्रीद विभागाने स्वीकारले आहे. प्रादेशिकतेचे भान ठेवत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले स्थान निर्माण करण्याचा नाटय़शास्त्र विभागाचा मानस आहे.