Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बॉक्साईट ट्रक अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांचे धनादेश
कोल्हापूर, २३ जून / विशेष प्रतिनिधी

 

बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या ट्रक अपघातात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला.बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या ट्रक अपघातात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी बॉक्साईट कंपन्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळवून दिली. आज स्वत: जिल्हाधिकारी देशमुख यांनी मृतांच्या नातेवाईकांना बोलावून पाच लाख रूपयांचा धनादेश त्यांना प्रदान केला. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी वासुदेव गुरव उपस्थित होते.
२ मे २००९ रोजी िलगनूर जवळ बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या ट्रकने बळवंत बाबुराव मोघर्डेकर (रा.मेघोली ता.भुदरगड) यांचा बळी घेतला. हिंदूाल्को कंपनीसाठी वाहतूक करणाऱ्या ट्रक अपघातात बळवंत मोघर्डेकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी शोभा बळवंत मोघर्डेकर यांना कंपनीने पाच लाख रूपयांची मदत दिली. दुसऱ्या एका अपघातात यशवंत वसंतराव घोरपडे हे ठार झाले होते.३० मार्च २००९ रोजी हा अपघात झाला होता. यशवंत घोरपडे यांच्या पत्नी योगिता घोरपडे यांना पंडित माईन्स या कंपनीने पाच लाख रुपयांची मदत दिली.
जिल्हाधिकारी देशमुख यांच्या प्रयत्नामुळे दोनही मृतांच्या नेतवाईकांना दिलासा मिळाला आहे. मदत मिळालेल्या निधीचा योग्य उपयोग करा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.