Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

साखरेबरोबर इतर उत्पादने आवश्यक - मंडलिक
कागल, २३ जून / वार्ताहर

 

साखर कारखान्यातून केवळ साखरेचे उत्पादन घेऊन चालणार नाही तर यासाठी अनुषंगिक उत्पादने घेणे आवश्यक असून त्यामुळेच कारखान्याची प्रगती साधली जाणार आहे. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे. यापूर्वी जाहीर केलेला वेतनकरार फरकासहीत लवकरच दिला जाईल असे प्रतिपादन खासदार मंडलिक यांनी केले.
हमीदवाडा येथील मंडलिक सहकारी साखर कारखान्याची बारावी वार्षिक सभा कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीत व उत्साही वातावरणात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी खासदार सदाशिवराव मंडलिक होते. खासदार मंडलिक यांनी या सभेत जे ठराव मांडले आहेत ते सर्व मान्य केल्याचे सांगितले. कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक सुनील मोदी म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांचा विजय ऐतिहासिक असून तो सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. या निवडणुकीत कागलकरांनी एकजूट दाखवून १८ हजारांचे मताधिक्क्य़ दिल्याने जिल्ह्य़ाच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे.
लोकसभेतील ऐतिहासिक विजयाबद्दल खासदार मंडलिक यांचा कारखान्यातर्फे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मंडलिक यांच्या विजयात मोलाचा सहभाग असलेले प्रश्न.संजय मंडलिक, सुनील मोदी, सुहास लटोरे, मुरगूडचे नूतन नगराध्यक्ष सुखदेव येरूडकर, उपनगराध्यक्ष पांडुरंग भाट, चंद्रकांत गवळी यांचे सत्कार करण्यात आले.
प्रश्न.संजय मंडलिक यांनी स्वागत व प्रश्नस्ताविक केले. विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन कार्यकारी संचालक पी.जे.चिटणीस यांनी केले. बापूसो भोसले पाटील यांनी आभार मानले. कारखान्याचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.