Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे अक्कलकोटमध्ये धर्मसंकीर्तन सोहळा
सोलापूर, २३ जून/प्रतिनिधी

 

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा २२ वा वर्धापनदिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सवामिनित्त २७ जून ते ६ जुलैपर्यंत मंडळाच्या प्रश्नंगणात धर्मसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली.
दि. २७ रोजी सायंकाळी ४ वाजता सोलापूरच्या योगीराज महिला भजनी मंडळाच्या भजनाने या धर्मसंकीर्तनास प्रश्नरंभ होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता पुण्याच्या नानासाहेब देशमुख व सहकाऱ्यांचा ‘स्वयंप्रकाशी’ हा स्वामिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. या धर्मसंकीर्तनात दररोज सायंकाळी ४ ते ६ पर्यंत भजन, सायंकाळी ७ ते ९ पर्यंत कीर्तन, प्रवचन होणार आहेत. यातील अन्य कार्यक्रम असे-दि.२८ रोजी अक्कलकोटच्या सत्संग महिला भजनी मंडळाचे भजन, ह.भ.प. मकरंदबुवा किलरेस्कर (कराड) यांचे कीर्तन, दि. २९-नगरेश्वर महिला भजनी मंडळाचे (सोलापूर) भजन, पं. ॠषिकेश महाले (पुणे) यांचा ‘भजनसंध्या’ हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, दि.३०-सरस्वती महिला भजनी मंडळाचे (अक्कलकोट) भजन, ह.भ.प. चंद्रदासबुवा जोशी (मडगाव, गोवा) यांचे कीर्तन, दि. १ जुलै-स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाचे भजन, जगदीशबुवा पोरे (आळंदी) यांचे श्री ज्ञानेश्वरीतील गुरुभक्तीवर प्रवचन, दि. २-श्रीराम महिला भजनी मंडळाचे भजन, ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदूरकर) यांचे कीर्तन, दि. ३-अक्कलकोट क्लब भजनी मंडळाचे भजन, ह.भ.प. वैभवबुवा ओक यांचे कीर्तन, दि. ४-दत्तप्रसन्न महिला भजनी मंडळाचे भजन व टिपरी, पुण्याच्या कलावंतांचा भक्तिसंगीत कार्यक्रम, दि. ५-ज्ञान माउली महिला भजनी मंडळाचे (नगर) भजन व भारुड, ह.भ.प. श्रीरामबुवा पुरोहित (कर्जत) यांचे ‘अपार संसार समुद्रामध्ये’ या विषयावर प्रवचन, दि. ६-ज्ञानेश्वरी भजनी मंडळाचे (बेलाटी, ता. उत्तर सोलापूर) भजन, पुण्याच्या स्वामिनी प्रस्तुत श्री. संदीप पाटील व सहकलाकारांचा ‘भक्तिसुधा’ हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम व रात्री ९.३० वाजता निपाणीच्या श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ प्रस्तुत ‘सूर भक्तीचे उमटले’ या कार्यक्रमाने धर्मसंकीर्तनाचा समारोप होणार आहे.
मंगळवारी ७ जुलै रोजी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमेनिमित्त अन्नछत्र मंडळात सातारचे छत्रपती श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांच्यासह ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, आमदार भाई जगताप, सिनेनाटय़ अभिनेते मोहन जोशी, आयकर अधिकारी ए.आर. चंद्रशेखरन या मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थाना महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. दुपारी गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार असून नंतर हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप होणार आहे. सायंकाळी ६ वाजता श्री स्वामी समर्थ पादुका पालखी व रथाची भव्य मिरवणूक निघणार आहे. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव श्यामराव मोरे, अमोल भोसले, विश्वस्त अभय खोबरे, अप्पा हंचाटे व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.