Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पेन्शनर्स असोसिएशनची सांगलीत निदर्शने
सांगली, २३ जून / प्रतिनिधी

 

केंद्रीय निवृत्तिवेतनधारकांना मंजूर केलेल्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील तरतुदी राज्य निवृत्तिवेतनधारकांनाही लागू कराव्यात, या मागणीसाठी सांगली जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात असोसिएशनचे दीनानाथ डोंगरे, अमित ठाकर, मुरलीधर जोशी, सुधाकर जोशी, श्रीराम छत्रे, सुरेंद्र पेंडुरकर, पांडुरंग साठे, कल्लाप्पा हिंगणे, श्रीमती नंदा कामाली, अरविंद दप्तरदार, जयंत दत्तवाडकर, बापू शेळके यांच्यासह अनेक निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.
मिरजेतही आंदोलन
अतिवृद्ध निवृत्तिधारकांच्या निवृत्तिवेतनात वाढ करावी, यासह अन्य विविध मागण्यांसाठी तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ. विकास खरात यांना देण्यात आले. त्यात पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी करावी, राज्य शासनाच्या कुटुंबाची व्याख्या केंद्र शासनाप्रमाणे करून नियमात बदल करावा, कमीत-कमी निवृत्तिवेतन साडेतीन हजार रुपये करावे व थकबाकी दोन वार्षिक हप्त्यात मिळावी अशा नऊ मागण्या करण्यात आल्या.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मकरंद देशपांडे व पांडुरंग कोरे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.