Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९


गेले अनेक दिवस हुलकावणी देणारा पाऊस मंगळवारी सकाळी बरसला आणि मुंबईकर सुखावले. मात्र मरिन लाइन्स येथे सोमवारी संध्याकाळपासून पावसाचे ढग दाटून आले होते. (छाया : प्रशांत नाडकर )

पंचनामा श्वेतपत्रिकेचा
पाण्यावरून दंगली पेटण्याची नगरसेवकांना भीती मुंबईत अनेक ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालली आहेत. या संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यासाठी पालिकेने श्वेतपत्रिका जारी केली आहे. या श्वेतपत्रिकेचा हा लेखाजोखा..
संदीप आचार्य
मुंबईतील पाणीपुरवठय़ाबाबत महापालिकेच्या जलखात्याने तयार केलेल्या श्वेतपत्रिकेत अनेक गोष्टींची लपवाछपवी करण्यात आली असून भविष्यात मुंबईत जाती-पातींवरून नव्हे तर पाण्यावरून दंगली पेटण्याची भीती पालिकेतील नगरसेवकांकडूनच व्यक्त करण्यात येत आहे.

जर्मनीत दहशतवादविरोधी यंत्रणा अहोरात्र कार्यरत!
प्रणव धल सामंता

प्रगत देशांप्रमाणेच जर्मनीतही दहशतवादविरोधी केंद्र, यंत्रणा आहे आणि त्याचे काम अहोरात्र सुरू असते. या यंत्रणेत सुमारे ४० निरनिराळ्या संस्थांचा सहभाग आहे. ते प्रत्येक राज्याच्या सतत संपर्कात असतात. देशातून, तसेच बाहेरून येणारी सर्व माहिती, गुप्तचरांकडून येणारे अहवाल याचे हे प्रमुख केंद्र आहे. तरीही ते राज्यांशी सतत संपर्कात असते हे विशेष!

‘बेस्ट’च्या जागी ‘जेएनएनआरयूएम’चा लोगो
कैलास कोरडे

‘बेस्ट’ उपक्रमाच्या सर्व बसेसवर सध्या चारही बाजूंनी लाल-सोनेरी रंगसंगतीत ‘बेस्ट’ असे लिहिलेले दिसते. जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्यूअल मिशन (जेएनएनआरयूएम)अंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या नव्या अत्याधुनिक बसेसवर मात्र त्याजागी अथवा बाजूला ‘जेएनएनआरएमयू’ असा लोगो झळकणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘बेस्ट’ला हा बदल करावा लागणार आहे.


अ‍ॅड‘मिशन
ऑनलाइन प्रवेश कसा घ्याल?
मक्र्युरी मोघे

२००९-२०१० या शैक्षणिक वर्षांसाठी एफ.वाय.जे.सी. मध्ये प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासन-शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया तयार केली आहे. विविध कॉलेजातून प्रवेशअर्ज आणणे, तो भरून गुणवत्तायाद्या तपासत कॉलेजातून हिंडण्याचे श्रम आता वाचणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊन मगच प्रवेश अर्ज भरा.

अ‍ॅड‘मिशन
९०:१० कोटा शैक्षणिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांच्या हिताचा
प्रतिनिधी

९०:१० कोटय़ामुळे राज्य शिक्षण मंडळ (एसएससी) आणि आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करीत आहे, असा युक्तीवाद आयसीएसई, सीबीएसईच्या विद्यार्थी-पालकांकडून तसेच संस्थाचालकांकडून करण्यात येत आहे. मात्र या कोटय़ामुळे शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

श्रीरंग गोडबोले, केदार शिंदे यांना राजेंद्र सप्रे स्मृती पुरस्कार
प्रतिनिधी

सप्रे कुटुंबियांकडून देण्यात येणाऱ्या राजेंद्र सप्रे स्मृती पुरस्कारासाठी लेखक-दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले व नाटय़-चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांची निवड झाली आहे. हे पुरस्कार अनुक्रमे २००८ आणि २००९ या वर्षीचे आहेत. प्रसिद्ध गायिका योजना शिवानंद यांचे ज्येष्ठ बंधू राजेंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. १० हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २००२ या वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत. योजना प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्ताने येत्या ३ जुलै रोजी दुपारी ४ ते १० या वेळेत माटुंगा येथील यशवंत नाटय़ संकुल येथे होणाऱ्या ‘नामाचा गजर’ या कार्यक्रमात गोडबोले व शिंदे यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.