Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आयुष्य कामगारांप्रती समर्पित -खा. मुत्तेमवार
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

 

आपले आयुष्य कामगारांप्रती समर्पित असल्याचे सांगून कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन खा. विलास मुत्तेमवार यांनी दिले.राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे बैद्यनाथ चौकातील सभागृहात नुकताच खासदार मुत्तेमवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमात आ. दीनानाथ पडोळे, संघाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. एस.डी. ठाकूर, अध्यक्ष गंगाधर पारखेडकर, जिल्हा इंटकचे अध्यक्ष एन. एस. पिल्लई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुत्तेमवार यांनी नागपुरात औद्योगिक हालचाली वाढवण्यावर जास्त भर देणार असल्याचे सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही समयोचित्त विचार व्यक्त केले.
संचालन तुकाराम डेकाटे यांनी केले. कार्यक्रमाला शेषराव डांगे, राजेश निंबाळकर, राजेंद्र हरडे, यशवंत कुंभलकर, मुकुंद मुळे, वसंत अनवाने, आनंद बडवे, श्यामराव सेलूरकर, श्रीराम घोडके, सुधाकर सदावर्ती, प्रेमताज मोवाडे, रामभाऊ नंदनवार, शेख सत्तार, शेख नादर, अजय लांबट, मधुकर सुर्यवंशी, महानंदा ढोबळे, विनोद जगताप, वसंता कुंभारे, दीनानाथ निमजे यांच्यासह मोठय़ा संख्येने कामगार उपस्थित होते.